अ‍ॅपशहर

सेवेकरी महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

आश्रमात सेवेकरी असलेल्या ५२ वर्षीय महिलेवर भर रस्त्यात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना कल्याण-मुरबाड रस्त्यावरील पाचवा मैल परिसरात घडली आहे. महिलेवर दारूच्या नशेत बलात्कार करणारा ट्रॅव्हल चालकाला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनास्थळी सापडलेल्या आरोपीच्या पाकिटावरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

Maharashtra Times 30 Sep 2019, 2:15 am
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape

आश्रमात सेवेकरी असलेल्या ५२ वर्षीय महिलेवर भर रस्त्यात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना कल्याण-मुरबाड रस्त्यावरील पाचवा मैल परिसरात घडली आहे. महिलेवर दारूच्या नशेत बलात्कार करणारा ट्रॅव्हल चालकाला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनास्थळी सापडलेल्या आरोपीच्या पाकिटावरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

उल्हासनगरमध्ये राहणारी ५२ वर्षीय महिला कल्याण-मुरबाड रस्त्यावरील असलेल्या एका आश्रमात सेवेकरीचे काम करते. यासाठी दररोज उल्हासनगरहून आश्रमात पायी ये-जा करते. २३ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे महिला रात्री पावणे नऊच्या सुमारास आश्रमातील सेवेचे काम आटोपून घरी चालत निघाली होती. रस्त्यात अचानक समोर आलेल्या एका तरुणाने तिला रस्त्याशेजारी असलेल्या गवतात ओढत तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी पळून गेला तर पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. यादरम्यान पाचवा मैल परिसरात टिटवाळा पोलिसांनी काही तरुणांची विचारपूस केली. या चौकशीत लखन देवकर या तरुणाचे पैशाचे पाकीट हरविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तर लखनकडे एका महिलेची पर्स असल्याची माहितीही हाती आली. पोलिसांनी तपास केला असता घटनास्थळी बलात्कार केल्यावर तो पीडित महिलेची पर्स, छत्री, जेवणाचा डबा घेऊन पळाला होता. मात्र झटापटीत त्याचे पाकीट गहाळ झाले होते. ते शोधण्यासाठी पुन्हा घटनास्थळी पोहोचलेल्या लखनला पोलिसांनी अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज