अ‍ॅपशहर

एमएमआर विभागातील प्रतिनिधींचे मुंबईत शिबीर

एमएमआरडीएने २०१६ ते २०३६ या कालावधीसाठी तयार केलेल्या प्रारूप एमएमआर आराखड्यास विरोध होत आहे. या विषयावर मुंबई महानगर प्रदेशातील विविध संघटना आणि राजकीय कार्यकर्ते, प्रतिनिधींचे शिबीर व चर्चासत्र १९ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव पश्विम, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. वसईतील कार्यकर्तेही या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Times 18 Jan 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम workshop for mmr region representative
एमएमआर विभागातील प्रतिनिधींचे मुंबईत शिबीर

एमएमआरडीएने २०१६ ते २०३६ या कालावधीसाठी तयार केलेल्या प्रारूप एमएमआर आराखड्यास विरोध होत आहे. या विषयावर मुंबई महानगर प्रदेशातील विविध संघटना आणि राजकीय कार्यकर्ते, प्रतिनिधींचे शिबीर व चर्चासत्र १९ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव पश्विम, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. वसईतील कार्यकर्तेही या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात नियोजनकार चंद्रशेखर प्रभू आराखड्यातील विषयांवर सविस्तर मांडणी व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उल्का महाजन, सुरेखा दळवी, ब्रायन लोबो, निरा आडारकर, गजानन खातू, तापती मुखोपाध्याय हेसुद्धाही मार्गदर्शन करतील आणि चर्चासत्र व प्रशिक्षण शिबिरात भाग घेतील, असे सांगण्यात आले. एमएमआरडीएच्या या आराखड्याविरोधात पुढील कृती काय करायची, आंदोलनाचे स्वरूप कसे असेल याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. यात विविध संघटनांचे प्रतिनिधी व चळवळीतील राजकीय कार्यकर्ते, नेते सहभागी होणार आहेत.

यापूर्वी मुंबई येथे जनता दलाच्या प्रदेश कार्यालयात दोन सभा झाल्या. त्यामध्ये या आराखड्याबाबत चर्चा झाली होती. तसेच एमएमआरडीअेचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्याबरोबर नुकतेच वांद्रे येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात शिष्टमंडळाने भेट घेऊन आराखड्याबाबत चर्चा केली होती. आता पुढील कृती ठरविण्यासाठीह्म् ‘जनतेचा विकास आराखडा मंच’ संलग्न जागतिकीकरण विरोधी कृती समिती या नावाने व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी जागृती केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज