अ‍ॅपशहर

महाराष्ट्र हादरला! सख्ख्या भावाकडून लहान बहिणीचे शोषण, सहा महिन्याची गर्भवती राहिली अन्...

Maharashtra Rape Victim : नात्याला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्राच्या वर्ध्यामध्ये समोर आली आहे. इथे एका सख्ख्या भावानेच आपल्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे तब्बल सहा महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाला आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2022, 12:44 pm
वर्धा : मागील काही दिवसांपासून समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत घटना घडताना दिसत आहे. मोबाईल आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा परिणाम युवकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशातच वर्धेत एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिनीचे शोषण केल्याची खळबळजनक धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra rape victim


पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले असता पीडिता ६ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतीय संस्कृतीत काही नाती खूप पवित्र मानली जातात. त्यामध्ये आई-मुलगा व बहीण भावाचे नाते सामील आहे. मात्र, वर्धा शहरात मानवतेला कलंकित करणारे प्रकरण समोर आले आहे.

हॉर्नचा आवाज न ऐकल्याने १६ वर्षीय तरुणीने मूकबधीर व्यक्तीचा केला खून, भर रस्त्यात चिरला गळा
सख्या भावाने बहिणीवर अत्याचार करण्याची लाजीरवाणी घटना घडली. १५ वर्षीय पीडिता घरी होती. तिचे आई-वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम १७ वर्षीय भावाने बहिनीचे शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्याने घरच्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने बयाण देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती. यामुळे हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तिला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पानावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेचे बयाण नोंदविल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

खळबळजनक! विद्यार्थिनीला शिवीगाळ केल्याच्या रागात शिक्षिकेला नग्न केलं, माथेफिरू शाळेत घुसले आणि...
सख्ख्या बहिनीचे शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शहर पोलिसांनी विकृत असलेल्या १७ वर्षीय भावाला ताब्यात घेतले. त्याचेही बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख