अ‍ॅपशहर

वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा गर्भपात, आरोग्य विभागाने चौकशीचे फास आवळले, कदम हॉस्पिटलची कसून चौकशी

आर्वीच्या कदम रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाने चौकशीचे फास आवळले आहेत. आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात जवळपास एक ते दीड तास कसून चौकशी केली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 21 Jan 2022, 10:01 pm
वर्धा : आर्वीच्या कदम रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाने चौकशीचे फास आवळले आहेत. आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात जवळपास एक ते दीड तास कसून चौकशी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Wardha District health Department inquiry arvi kadam Hospital Over minor girl abortion


आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक अर्चना पाटील सकाळी आर्वीमध्ये आल्या होत्या. डॉ. अर्चना पाटील यांनी सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली. येथे जवळपास एक ते दीड तास त्यांनी माहिती घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केली.

येथील चौकशीनंतर डॉ. पाटील यांनी कदम हॉस्पिटलची पाहणी केली. गोबरगॅसचा खड्डा तसंच इतर भागाची त्यांनी पाहणी करत माहिती घेतली. त्यावेळी डॉ. पाटील यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सचिन तडस, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर सुटे, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. त्यात उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याने रुग्णांना येत असलेल्या अडचणींची माहिती दिली.

जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताची घटना उघडकीस आल्यानंतर ५ आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील डॉक्टर ज्यांना अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला आहे, त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


वर्ध्याची नेमकी घटना काय?

आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले, मुलगा साडे सतरा वर्षांचा आहे तर मुलगी १३ वर्षांची आहे. यादरम्यान, मुलीला गर्भधारणा झाली, या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून संबंधितांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. शहरातील प्रसिद्ध डॉ. रेखा कदम यांनी मुलीचा गर्भपात केला. ८० हजरा रुपये घेऊन हा गर्भपात करण्यात आला. याबाबत पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी भल्या सकाळी डॉक्टरांना ताब्यात घेतलं तसंच या केसमधील आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज