अ‍ॅपशहर

हिंगणघाट जळीतकांड : दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला, आता ५ फेब्रुवारीला न्यायालय निकाल सुनावणार

हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद संपल्याने न्यायालयात कामाकाज अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती मात्र पाच फेब्रुवारीला या प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावणार आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 21 Jan 2022, 6:52 pm
वर्धा : हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद संपल्याने न्यायालयात कामाकाज अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती मात्र पाच फेब्रुवारीला या प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Wardha hinganghat murder case Court decision on 5 february


मृत मुलगी हिंगणघाटच्या स्व.आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यकरत होती. यामध्ये पीडिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतली आणि तिला पेटवून टाकले.

यात गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत पीडितेवर नागपुरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय शुक्रवार २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते.

या खटल्याचा निकाल जलदगतीने लागावा या दृष्टीने उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केला की नाही हे आता न्यायालय ठरवणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिलीय. आरोपी विकेश नगराळेचे वकीलांनी, 'दोन्ही पक्षाचे लेखी आणि मौखिक युक्तिवाद संपला असून न्यायालय पाच तारखेला निर्णय देणार' असल्याचं सांगितले.

हिंगणघाट येथील बहुचर्चित असलेल्या जळीतकांड प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. आता या प्रकरणाचा निकाल लागणार असून सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे. तर याच प्रकरणानंतर राज्यात शक्ती कायदा आणण्याचं सांगण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनात हा कायदा विधिमंडळात मंजूर सुद्धा करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज