अ‍ॅपशहर

टोल नाक्यावर विकले तब्बल पाच कोटींचे लॅपटॉप; दोघांनी कसा केला घोटाळा? पाहा...

ट्रक ड्रायव्हर, क्लिनरने एका कंपनीला कोट्यवधींचा चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी वर्धामध्ये वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेकडो लॉपटॉपची परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2022, 2:11 pm
वर्धा : ब्लू डार्ट कंपनीच्या चेन्नई वेअर हाऊसमधून गुरुग्राम येथे लॅपटॉप पोहचविण्यासाठी निघालेल्या ट्रॅकमधील लॅपटॉप ट्रक ड्रायव्हरसह क्लिनरने परस्पर विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धाच्या दरोडा टोल नाका परिसरात ही घटना घडली. ट्रक चालक आणि क्लिनरने तब्बल ५ कोटी ४३ लाख २ हजार ५१८ रुपये किंमतीच्या १ हजार ४१८ लॅपटॉपची परस्पर विल्हेवाट लावून अफरातफर केली. या प्रकरणी वडनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चालक आणि वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम over 5 crore rupees laptop sale on toll plaza in wardha truck driver and cleaner absconding
टोल नाक्यावर विकले तब्बल पाच कोटींचे लॅपटॉप; दोघांनी कसा केला घोटाळा? पाहा...


मोमीन महमूद खान (राहणार हमतगाव गुरुग्राम), रॉबीन नबाब खान (राहणार धुलावड तावडू गुरुग्राम हरयाणा) हे १६ मे २०२२ रोजी ब्लू डार्ट कंपनीच्या चेन्नई वेअर हाऊसमधून लॅपटॉप पोहचविण्यासाठी गुरुग्राम येथे जाणार होते. त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने विश्वासाने ३ हजार ८२४ लॅपटॉप सुपूर्द केले. मात्र, चालक आणि वाहकाने कंपनीचा विश्वासघात केला. त्यांनी वर्धा जिल्ह्याच्या दरोडा टोलनाका परिसरात वाहन उभे केले. ३ हजार ८२४ लॅपटॉप पैकी १ हजार ४१८ लॅपटॉपची परस्परर विक्री केली. या दोघांनी ५ कोटी ४३ लाख २ हजार ५१८ रुपयांचा अपहार केल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी अशफाक मुस्तफा खान (रा. कळमाना जि. नागपूर) यांनी वडनेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

जेवण वाढायला उशीर, बापाकडून लाकडी फळीने डोक्यात वार करत अल्पवयीन लेकीची हत्या

वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तांत्रीक पद्धतीने तपास सुरू केलेला आहे. आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचारी दिल्ली येथील गुरुग्राम येथे रवाना झाले आहेत. तर विक्री झालेल्या मालाची रिकव्हरी करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

‘मेरे सपने बडे है...', चिठ्ठी लिहून अल्पवयीन मुलीचे घरातून पलायन, पालकांना बसला धक्का

महत्वाचे लेख