अ‍ॅपशहर

बायकोला छेडलं म्हणून पोलिसांत गेला पण आरोपी मोकाट, पतीने पोलीस स्टेशनमध्येच केलं भयंकर कृत्य

Washim News Today Marathi : राज्यात गुन्ह्यांचे प्रकार काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. असाच एक धक्कादायक प्रकार वाशिममध्ये समोर आला आहे. इथे एका विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आला. यानंतर पीडितेच्या पतीने वारंवार पोलिसांता धाव घेतली पण याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने पतीने असं काही केलं की सगळ्यांनाच धक्का बसला.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2023, 9:33 am
वाशिम : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलेचा १५ जानेवारीला विनयभंग झाल्याची फिर्याद मानोरा पोलिसांत दाखल करण्यात आली. मात्र, सतत मागणी करून आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे पीडित महिलेच्या संतापलेल्या पतीने चक्क पोलीस ठाणे गाठून परिसरातच विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार २० जानेवारीला घडला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम washim crime news


मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील एका गावातील महिलेचा १५ जानेवारी रोजी विनयभंग झाला होता. याप्रकरणी फिर्यादी महिलेने मानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी रणजित अजाबराव राठोड याच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आली.

आरोपीला अटक करावी या मागणीसाठी मसगील पाच दिवसांपासून पीडितेच्या पती पोलीस स्टेशनला चकरा मारत आहे. मात्र, अधिकारी आमचा तपास सुरू आहे असे जुजबी उत्तर देतात आणि आरोपी हा मोकाट फिरत आहे.

यामुळे संतापलेल्या पीडित महिलेच्या पतीने मानोरा पोलिस स्टेशन गाठून विषारी कीटकनाशक द्रव्य प्राशन केले. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याची वाशिम येथील शासकीय रुग्णालयात रवानगी करण्यात आली. पतीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख