अ‍ॅपशहर

VIDEO : संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आला अन्..., चोरट्याचं कृत्य सीसीटीव्हीत कैद

Washim Crime News : चोरट्याने रात्री मंदिरात कुणीही नसल्याची संधी साधत दानपेटी फोडून ही रक्कम चोरून नेली असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2022, 3:44 pm
वाशिम : सध्या सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे. दिवाळीत अनेक जण मंदिरात देवाकडे सुख-समृद्धी मागण्यासाठी जात असतात. मात्र वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील संत गजानन महाराज मंदिरात एका चोरट्याने रात्री १ वाजताच्या सुमारास घुसून तेथील दानपेटीतील रक्कम चोरून नेली आहे. दानपेटीत अंदाजे ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gajanan maharaj mandir 1
गजानन महाराज मंदिर


दानपेटीतील रक्कम चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दानपेटीतील पैसे पळवणाऱ्या चोरट्याने दिवसा मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने येऊन मंदिर परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर रात्री मंदिरात कुणीही नसल्याची संधी साधत दानपेटी फोडून ही रक्कम चोरून नेली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.



दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज