अ‍ॅपशहर

दूध आणायला गेलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; १८ दिवसांनी...

तबेल्यामध्ये दूध आणायला गेलेल्या चिमुरडीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना यवतमाळमधील (Yavatmal) उमरखेड (Umarkhed) शहरात घडली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 27 May 2021, 1:25 pm

हायलाइट्स:

  • यवतमाळमधील उमरखेडमध्ये संतापजनक घटना
  • पाच वर्षीय चिमुरडीवर ५० वर्षीय इसमाकडून लैंगिक अत्याचार
  • आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sexual Harassment
प्रतिनिधी । यवतमाळ
एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना तब्बल १८ दिवसानंतर मंगळवारी उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी हा अद्यापही फरार आहे. शेख नजीर शेख उस्मान वय (५० वर्षे, राहणार कांचीपुरा उमरखेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

उमरखेड शहरातील कांचीपुरा येथील शेख नजीर शेख उस्मान याचा दूध व्यवसाय आहे. त्यांच्या गोठ्यात २० ते २५ म्हशी आहेत. त्यामुळं तो दररोज गोठ्यातच असायचा. पीडित मुलगी दूध आणण्याकरिता शेख नजीर शेख उस्मानच्या गोठ्यात गेली असता त्याने आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे प्रकरण मंगळवारी उघडकीस आल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. काही तरुणांच्या जमाव रात्रीच्या सुमारास शेख नजीर शेख उस्मान यांच्या घरावर चाल करून गेल्याची चर्चा शहरात सुरू झाली.

वाचा: 'मोदींनी चाळीस वेळा भेट दिली, त्याबद्दल संभाजीराजे का सांगत नाहीत?'

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी, २६ मे रोजी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीला अटक करण्याची मागणी मागणी केली आहे. आरोपीला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर जमाव धडकला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी आरोपींना तात्काळ अटक करू, असे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अन्यथा, पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करणार

आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा एमआयएमनं दिला आहे. येत्या तीन दिवसात आरोपी अटक न झाल्यास उमरखेड पोलिस ठाण्यासमोर वार्डातील नागरिकांसह उपोषणाला बसू, असं एमआयएमचे नगरसेवक अफसरभाई जलील कुरेशी यांनी म्हटलं आहे.

वाचा: महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल; चंद्रकांत पाटील यांचा दावा
टीम मटा ऑनलाइन यांच्याविषयी
टीम मटा ऑनलाइन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज