अ‍ॅपशहर

पुलावरून जाताना बाईक घसरली; नदीत पडला, पाय दुचाकीत अडकले अन् तरुणाचा करुण अंत झाला

बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरण प्रकल्पासमोर असलेल्या पुलावरून दुचाकी घसरल्याने नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. आज दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2022, 10:16 pm
यवतमाळ: बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरण प्रकल्पासमोर असलेल्या पुलावरून दुचाकी घसरल्याने नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. आज दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. गौरव भिमराव महानुर (वय २० वर्षे रा. अंतरगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youth died
दुचाकी नदीपात्रात पडून तरुणाचा मृत्यू


अंतरगाव येथील भिमराव महानुर यांचे बाभूळगाव शहरात फोटोग्राफीचे दुकान आहे. दुपारच्या सुमारास भिमराव यांचा मुलगा गौरव हा दुकानामधून बाहेर कामनिमित्त जातो असे सांगून निघून गेला होता. तो कोपरा जानकर मार्गे बेंबळा प्रकल्पाच्या टाक्यासमोर असलेल्या छोट्या पुलावरून विश्रामगृहाकडे दुचाकीने जात होता. दरम्यान बेंबळा प्रकल्पाचे काही दरवाजे अंशतः उघडे असल्याने पुलावरून पाण्याचा प्रवाह वाहत असताना गौरवची दुचाकी पुलावरून घसरली. त्यामुळे तो डाव्या बाजूने नदी पात्रात पडला. त्या ठिकाणी पाणी जास्त असल्याने व दुचाकीमध्ये त्याचे पाय अडकल्याने तो नदीपात्रात बुडून गुदमरून मृत पावला.
माझ्या जीवावर मजा मारली, केस स्ट्रेटनिंग केले! प्रेयसीमुळे कर्जबाजारी तरुणाचं टोकाचं पाऊल
घटनेची माहिती मिळताच बेंबळा प्रशासनाने दरवाजे बंद केले. त्यामुळे पुलावरून सुरू असलेला पाण्याचा प्रवाह बंद झाला. नागरिकांनी गौरवचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बाभूळगाव पोलीस करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज