अ‍ॅपशहर

जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड, ८ कर्मचाऱ्यांना बेड्या, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळच्या जिल्हा परिषद परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर अवधुतवाडी पोलिसांनी धाड टाकून आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सीईओ वाहन चालक त्या ठिकाणाहून पसार होण्यात यशस्वी झाला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 31 Jan 2022, 7:16 pm
यवतमाळ : जिल्हा परिषद परिसरात सुरु असलेल्या एका गंजीपत्ता जुगार अड्ड्यावर अवधुतवाडी पोलिसांनी धाड टाकून आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून सीईओ वाहन चालक त्या ठिकाणाहून पसार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई आर्णी मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद कार्यालय परिसरात शुक्रवार, दि. २८ जानेवारीला रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून या कारवाई पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yavatmal Awdhutwadi police Arrest 8 Accussed who play gambling in zp office area


प्रकाश कुद्रापवार वय ५३ वर्ष रा. प्रभात नगर, देवानंद जामनकर वय ४८ वर्ष रा. शास्त्री नगर, गणेश गोसावी वय ५५ वर्ष रा. शिवम कॉलनी, प्रकाश व्यास वय ५८ वर्ष रा. जि.प.कॉर्टर जामनकर नगर, गुणवंत ढाकणे वय ४७ वर्ष रा. जामनकर नगर, अनिल शिरभाते वय ४५ वर्ष रा. जामनकर नगर, संदिप श्रीरामे वय ४५ वर्ष रा. वैभव नगरी, चरण राठोड वय ५३ वर्ष रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नाव असून येरावत चव्हाण वय ५५ वर्ष रा. यवतमाळ असे घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झालेल्या जि.प. सीईओंच्या वाहन चालकाचे नाव आहे.

शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या परिसरात काही कर्मचारी आणि वाहन चालक जुगार खेळत होते. याबाबतची गोपनीय माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळाली होती. दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच एक पथक तयार करून त्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे आठ कर्मचारी जुगार खेळतांना आढळून आले तर एक जण त्या ठिकाणाहून पळ काढण्यात यशस्वी झाला. तो जिल्हा परिषदेच्या सीईओंचा वाहन चालक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी नऊ जणांविरोधात अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३१ हजार ११० रूपयांची रोख, नऊ मोबाईल, पाच दुचाकी आणि दोन चारचाकी असा एकूण ५ लाख ४ हजार ६१० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक दर्शन दिकोंडवार, सचिन सरकटे, पथकातील सुरेश मेश्राम, प्रदिप कुरडकर, दिनेश निंर्बते, बबलू पठाण, सागर चिरडे, धनंजय पोटपल्लीवार, प्रशांत राठोड यांनी पार पाडली.

जुगाऱ्यांवर कारवाईचे निर्देश...

जिल्हा परिषदेच्या आवारात जुगार खेळणे हा गंभीर प्रकार आहे. त्या जुगार खेळण्याच्या घटनेत सहभागीवर तात्काळ निलंबन आणि शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषद परिसरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, आवश्यक त्या ठिकाणी नव्याने बसविण्यात यावे.

महत्वाचे लेख