यवतमाळ : यवतमाळमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शहरातील विठ्ठलवाडी भाजी मंडई परिसरात सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. आरिफ शहा शफीक शहा (३०) रा. पिपळगाव असं मृत तरुणाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी आरिफचा काही तरूणांशी वाद झाला होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी तिघांनी त्याला विठ्ठलवाडी परिसरात बोलावलं व शस्त्राने हल्ला करून खून केला.
शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं. त्यावरून उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर, शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कर, डॉग स्कॉड, फिंगर एक्स्पर्ट आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरिफ शहा विरोधात शहर ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून जुन्या वादातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी रजिया शहा (४५) रा. ओम शिवम कॉलनी, पिंपळगाव या महिलेने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अनिकेत एगडवार (२२) रा. लोहारा, राहुल मरकुटे (२५) रा. वंजारी फैल, यवतमाळ यांच्यासह अन्य एका अनोळखी संशयिताविरुद्घ गुन्हा करण्यात येऊन दोघांनाही अटक करण्यात आलं आहे. या दोघांचीही चौकशी करण्यात येणार असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.