अ‍ॅपशहर

मनमाडला वाहनांची जाळपोळ

नाशिक पाठोपाठ आता मनमाड शहरातही वाहनांचे जळीतकांड व तोडफोडीचे प्रकार सुरू झाले आहेत. नांदगाव मार्गावरील शिवसेना कार्यालयामागील इमारत नजीक लावलेली वाहने गुरुवारी रात्री समाजकंटकांनी पेटवून दिली. तसेच शिवसेनेच्या रुग्णवाहिकेचीही तोडफोड केली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांसह शिवसैनिकात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

Maharashtra Times 30 Jul 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड नाशिक पाठोपाठ आता मनमाड शहरातही वाहनांचे जळीतकांड व तोडफोडीचे प्रकार सुरू झाले आहेत. नांदगाव मार्गावरील शिवसेना कार्यालयामागील इमारत नजीक लावलेली वाहने गुरुवारी रात्री समाजकंटकांनी पेटवून दिली. तसेच शिवसेनेच्या रुग्णवाहिकेचीही तोडफोड केली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांसह शिवसैनिकात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manmad vehicle burn in manmad
मनमाडला वाहनांची जाळपोळ


शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्या नांदगाव रस्त्यावरील सेना कार्यालयामागे हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेतर्फे शहरातून मोर्चा काढून उपविभागीय पोल‌िस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसात जर या समाजकंटकांचा तपास लागला नाही आणि आरोपीला अटक झाली नाही तर शिवसेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी दिला आहे. गुरुवारी रात्री मनमाड नांदगाव मार्गावर समित प्लाझा अपार्टमेंट नजीक लावलेल्या वाहनांची

तोडफोड व जाळपोळ करण्यात आली आहे. यात दोन चारचाकी, दोन दुचाकी व शिवसेनेच्या रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संताप निर्माण झाला. मोर्चात नगराध्यक्ष प्रवीण नाईक, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, गणेश धात्रक, शहराध्यक्ष जिल्हा उपप्रमुख सुनील पाटील, संघटक संतोष बळीद, नगरसेवक प्रमोद पाचोरकर शहराध्यक्ष मयूर बोरसे, अॅड. सुधाकर मोरे, महेंद्र शिरसाठ, सादिक तांबोळी, विठ्ठल नलावडे, योगेश इमले, अमोल दंडगव्हाळ, बबलू शेख, किशोर घोडके आदी सहभागी झाले होते. संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज