अ‍ॅपशहर

ऑलिंपिकनगरी उघडली

रिओ ऑलिंपिक अवघ्या दहा दिवसांवर आले असताना रविवारी ऑलिंपिक नगरीचे दरवाजे उघडण्यात आले. या ऑलिंपिक नगरीमधील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तथापि, ब्राझीलने अधिकृतरीत्या रविवारी ही ऑलिंपिकनगरी जगभरातील खेळाडूंसाठी खुली केली आहे.

Maharashtra Times 25 Jul 2016, 3:12 am
रिओ दी जनेरो : रिओ ऑलिंपिक अवघ्या दहा दिवसांवर आले असताना रविवारी ऑलिंपिक नगरीचे दरवाजे उघडण्यात आले. या ऑलिंपिक नगरीमधील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तथापि, ब्राझीलने अधिकृतरीत्या रविवारी ही ऑलिंपिकनगरी जगभरातील खेळाडूंसाठी खुली केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम olympic city rio de janeiro
ऑलिंपिकनगरी उघडली


ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारे १०,५०० खेळाडू आणि सात हजारांहून अधिक सहायक वर्ग येथे राहणार आहे. येथील माराकाना स्टेडियममध्ये ५ ऑगस्ट रोजी ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा रंगेल. या क्रीडानगरीत असलेली खानपानाची व्यवस्था तब्बल ३ फुटबॉल मैदानांएवढी मोठी आहे. तसेच तेथे सर्वप्रकारच्या सोयी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. या क्रीडानगरीत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी असलेले स्वयंसेवक हे अनेक भाषांत तज्ज्ञ आहेत. त्यातील हे इथियोपियाचे स्वयंसेवक तब्बल १४ भाषा जाणतात.

ऑलिंपिक नगरीची डोळ्यांचे पारणे फेडणारी काही दृष्ये...








महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज