अ‍ॅपशहर

कोथिंबीरीचे खुसखुशीत मुटकुळे

घरचा शेफ- कोथिंबीरीचे खुसखुशीत मुटकुळे पल्लवी कळमकर, अमेरिका साहित्य- भाजणीचं पीठ (भाजणीचं पीठ तयार करण्यासाठी १ किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, ...

Maharashtra Times 20 Jan 2018, 3:12 pm
कोथिंबीरीचे खुसखुशीत मुटकुळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कोथिंबीरीचे खुसखुशीत मुटकुळे


पल्लवी कळमकर, अमेरिका

साहित्य- भाजणीचं पीठ (भाजणीचं पीठ तयार करण्यासाठी १ किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, एक वाटी गहू,तांदूळ प्रत्येकी, विविध प्रकारच्या डाळी, मूग, मटकी, चणे ही कडधान्य), एक मोठी जुडी कोथिंबीर, धणे, तीळ, ओवा, लाल तिखट, हिंग, मीठ, साखर, दही, तेल

कृती- बाजारात भाजणीचं पीठ मिळतं, पण घरी भाजणीचं पीठ करायचं असल्यास साहित्यात सांगितल्याप्रमाणे सर्व धान्य भाजून घ्या. नंतर ते एकत्रित करून त्यात जिरे व धणे टाकून दळून घ्या. भाजणीचं पीठ एका भांड्यात घेऊन त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, ओवा, हिंग, चवीनुसार मीठ, तिखट, साखर, वाटीभर दही, तीन-चार चमचे तेल घालून मळून घ्या. मळलेल्या पिठाचे मुटकुळे (मुठीया-मुठीत पीठ घेऊन मूठ बंद करून दाब द्या) वळून घ्या. केलेले मुटकुळे तव्यावर तेल टाकून खमंग भाजून घ्या. तयार झालले मुटकुळे टोमॅटो सॉस अथवा पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज