अ‍ॅपशहर

उद्यानही विकसित करा

दक्षिण कोरियातील सेऊलच्या मत्स्यालयातून अडीच कोटी रुपये खर्चून आठ पेंग्विन जिजामाता उद्यानात (राणीचा बाग) आणण्यात आले आहेत. या नव्या पाहुण्यांमुळे राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढणार का याबद्दल जनसामान्यांच्या प्रतिक्रिया...

Maharashtra Times 28 Jul 2016, 1:18 am
दक्षिण कोरियातील सेऊलच्या मत्स्यालयातून अडीच कोटी रुपये खर्चून आठ पेंग्विन जिजामाता उद्यानात (राणीचा बाग) आणण्यात आले आहेत. या नव्या पाहुण्यांमुळे राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढणार का याबद्दल जनसामान्यांच्या प्रतिक्रिया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
उद्यानही विकसित करा


गर्दी वाढणार, मात्र...

मध्यंतरी जिजामाता उद्यानाची अवस्था एवढी खराब झाली होती की ते बंद करण्याची चर्चा सुरू झाली होती. आता पें​ग्विन आणल्याने नवे पक्षी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढणार हे नक्की. मात्र केवळ नव्या पाहुण्यांचा विचार न करता सध्या असलेल्या पक्षी व प्राण्यांची निगाही राखली पाहिजे.- नयना परदेशी

खर्च योग्य वाटत नाही

नवे पक्षी आणून राणीच्या बागेचे आकर्षण वाढविले ही स्तुत्य बाब आहे. पक्षी वाढले पाहिजेत हे निश्चित. मात्र एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य वाटत नाही. बागेत असलेल्या प्राणी व पक्षांचीही तेवढीच काळजी घेतली जावी. - वसंत कांबळे

पेंग्विनची काळजी घ्या

पेंग्विन आणल्याने गर्दी वाढणारच. मात्र आणलेल्या पक्षांची पालिका प्रशासनाने नीट काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कर्मचारी वर्ग नाही म्हणून एवढा मोठा खर्च वाया जाण्याची भीती आहे. राणीचा बाग आणखी विकसित करण्याचीही गरज आहे. - अजय घाटे

पैशाचा अपव्यय...

एवढा मोठा खर्च करून पक्षी आणण्याची गरज नव्हती. हा केवळ फार्स असून पैशाचा अपव्यय आहे. त्याऐवजी बागेत असलेल्यांची आणखी काळजी घेण्यात यावी. राणीच्या बागेच्या आजुबाजुला उंच इमारती होत आहेत. त्याचाही विचार प्रशासनाने करावा. - राजेंद्र जवंजाळ

गर्दी वाढण्याची शक्यता नाही

पेंग्विन आणल्याने गर्दी वाढेल असे वाटत नाही कारण आपल्याकडे पक्षीप्रेमी मंडळी फारशी नाहीत. तसेच हे पक्षी बर्फात राहत असल्याने त्यांच्यावर बराच खर्च करावा लागणार आहे. एवढा मोठा खर्च अनावश्यक वाटतो. - हेमंत केंजाळकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज