अ‍ॅपशहर

कुर्मगती कारभाराबाबत नाराजी

बहुप्रतीक्षित एसी लोकलला यंदा मुहूर्त मिळाला नाही. या थंडगार सेवेसाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. ‘हवा तेवढा वेळ घ्या, मात्र निदान ही सेवा तरी चांगली द्या, अशी रेल्वेच्या कुर्मगती कारभारामुळे नाराज असलेल्या प्रवाशांची भावना आहे.

Maharashtra Times 14 Oct 2016, 1:23 am
बहुप्रतीक्षित एसी लोकलला यंदा मुहूर्त मिळाला नाही. या थंडगार सेवेसाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. ‘हवा तेवढा वेळ घ्या, मात्र निदान ही सेवा तरी चांगली द्या, अशी रेल्वेच्या कुर्मगती कारभारामुळे नाराज असलेल्या प्रवाशांची भावना आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
कुर्मगती कारभाराबाबत नाराजी


आहे ती सेवा नीट द्या!

एसी लोकलपेक्षा, आहेत त्या गाड्या अगोदर व्यवस्थित चालवा. कधी कोलमडलेले वेळापत्रक, तर बहुतेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात मोनोचाही म्हणावा तसा फायदा होत नाही. वाढती लोखसंख्या लक्षात घेता, तातडीने कामे व्हायला हवीत.- सौरभ गुजर

बागूलबुवा कशासाठी?

एसी लोकल येण्याआधीच एवढा बागूलबुवा कशासाठी? महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन, सध्या अनेक गोष्टींची नुसती घोषणा केली जात आहे. प्रत्यक्षात कोणतीही कामे होताना दिसत नाहीत. त्यामुळे कामे पूर्ण झाल्यावर संबंधित लाभाची घोषणा सरकारने करावी.- रामेश्वरी गंजी

अगोदरच घोषणा कशासाठी

कामे होण्याआधीच ती पूर्ण झाल्यासारखी घोषणा करणे चुकीचे आहे. शिवाय कामे जलदगतीने पूर्ण करण्यापेक्षा ती योग्यपद्धतीने व्हायला हवीत. एसी लोकलची घोषणा पूर्वीच करणे चुकीचे होते. ती सेवेत आल्यानंतर अशी घोषणाबाजी करायला हवी होती. - सूरज मोरे

आधी लोकल नीट चालवा

सध्या आहेत त्याच लोकल चालवताना अनेक अडचणी येत आहेत. प्रथम त्यांवर योग्य तो तोडगा काढून, मगच एसी लोकलचा विचार करायला हवा होता. कारण तशा लोकल आल्या तरी त्या व्यवस्थित चालतील याची शाश्वती काय? - गिरीष खोत

सेवा सुरळीत हवी

एसी लोकलची नुसती घोषणा करून उपयोग नाही, तर ती प्रत्यक्षात आल्यानंतर सुरळीत सेवा मिळायला हवी. त्यासाठी हवा तेवढा वेळ घ्या, मात्र ही सेवा काही बिघाड होता द्या. तरच प्रवाशांना एसी लोकलचा आनंद मिळेल. - सुशील फोंडके

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज