अ‍ॅपशहर

मेहनतीचे ‘फळ’

कोकणातील कोकम, नाशिकची वाइन व महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरींना जीआय टॅग मिळणार असल्याने ही उत्पादने १०७पेक्षा अधिक देशांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली सर्वसामान्यांकडून या यशाबाबत उत्पादकांचे अभिनंदन होत आहे.

Maharashtra Times 14 Mar 2017, 3:04 am
कोकणातील कोकम, नाशिकची वाइन व महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरींना जीआय टॅग मिळणार असल्याने ही उत्पादने १०७पेक्षा अधिक देशांपर्यंत पोहोचणार आहेत. यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली सर्वसामान्यांकडून या यशाबाबत उत्पादकांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
मेहनतीचे ‘फळ’


महाराष्ट्राच्या शिरपेचात तुरा

यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. राज्यातील अनेक क्षेत्रांना यामुळे प्रोत्साहन मिळेल. मात्र महाराष्ट्रातील अन्य काही गोष्टींचेही चांगले कॅम्पेनिंग व्हायला हवे. खाद्यपदार्थ, पेहराव, मराठी सण आणि इत्यादी गोष्टीही जागतिक स्तरावर पोहचायला हव्यात. - सुशील फोंडके

शेतकऱ्यांच्या श्रमांचे चीज

कोकम आणि स्ट्रॅाबेरीला जागकित व्यासपीठावर स्थान मिळल्यास शेतकऱ्यांच्या श्रमाचे चीज होईल. त्यामुळे देशभरातून मागणी वाढून त्याला दोन पैसे जास्त मिळतील आणि व्यवसायात फायदा होईल. इतर शेतकऱ्यांनीही चांगले पीक काढून जगाचे लक्ष वेधून घेणे ही काळाची गरज आहे. - अनिकेत बागवे

संस्कृतीचाही गौरव व्हावा

महाराष्ट्रातील या फळांची खासियत जगभरात पोहचत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. महाष्ट्रातील किल्ले महत्त्वाची पर्यटन स्थळे व्हायला हवीत. छत्रपतींच्या पराक्रमाचा आपल्याला जसा अभिमान आहे तसा अभिमान आपण त्यांच्या गडकिल्ल्यांविषयीही दाखवायला पाहिजे. - जालिंदर तडावळे

देशाची मान उंचावली

या तीन फळांना जीआय टॅग मिळणार असल्याने आपल्या देशाची मान उंचावली आहे. बागायतदारांच्या मेहनतीला मिळालेली ही पावती आहे. हे यश पाहता अन्य फळबागायतदारांनीही मेहनतीने विविध फळे जागितक बाजारपेठेपर्यंत नेण्याबाबत प्रयत्न करायला हवेत. - सुरज मोरे

राज्यातील शेतकरी सक्षम

या तीन उत्पादनांना जीआय टॅग मिळणे ही फळबागायतदारांसाठी मोठी आनंदाची व गौरवाची बाब आहे. यातून त्यांना प्रोत्साहन मिळणार असून त्यांना आणखी चांगले काम करण्यास नक्कीच बळ मिळेल. इतर फळेही जागतिक पातळीवर गेल्यास शेतकरी सक्षम होईल. - सिद्धी महाडिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज