अ‍ॅपशहर

पालकांनो, सावधान!

सोशल मीडियावर लहान मुलांचे चित्र-विचित्र फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केले जातात. अनेकदा यात पालकही सहभागी असतात. परंतु, बालन्याय कायदा, २०१५ या नव्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे लहान मुलांची बदनामी झाल्यास पालकांनाही तुरुंगाची हवा खावी लागू शकते. याविषयी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया.

Maharashtra Times 11 Jun 2017, 12:50 am
सोशल मीडियावर लहान मुलांचे चित्र-विचित्र फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केले जातात. अनेकदा यात पालकही सहभागी असतात. परंतु, बालन्याय कायदा, २०१५ या नव्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे लहान मुलांची बदनामी झाल्यास पालकांनाही तुरुंगाची हवा खावी लागू शकते. याविषयी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
पालकांनो, सावधान!


पालकांनीही सुजाण व्हावे

लहान मुलांचेही सामाजिक आयुष्य असते. त्यामुळे पालकांनी किंवा वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांचे चुकीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले तर भविष्यात त्या मुलांसाठी कदाचित ते अडचणीचे ठरू शकते. सोशल मीडियाचा जबाबदार वापर करण्यासाठी पालकांनीही सुजाण होणे गरजेचे आहे.- दौलत जाधव

कायद्याचा दुरुपयोग नको

लहान मुलांच्या बदनामीकारक पोस्टबद्दल संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई हवीच. मात्र त्याचवेळी पालकांनी अजाणतेपणी आपल्या लहान मुलांचे काहीशा विचित्र अवस्थेतील फोटो पोस्ट केले आणि त्यात वाईट हेतू नसेल तर त्यांच्यावर कारवाईसाठी कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये.- मनीष कदम

तरतूद स्वागतार्ह

अन्य देशांच्या तुलनेत लहान मुलांच्या हक्कांविषयी आपल्या देशात तितकीशी सजगता व जबाबदारीची भावना दिसत नाही. मग सोशल मीडियावरील गोष्टींना तरी आळा कसा बसणार? या पार्श्वभूमीवर, नव्या कायद्याने चुकीच्या गोष्टींना चाप लागणार असेल तर त्याचे स्वागत करायला हवे.- परेश पेडणेकर

जबाबदारीची जाणीव हवी

हल्ली सोशल मीडियावर प्रत्येक जण खासगी आयुष्यातील प्रसंगाचे फोटो पोस्ट करत असतो. मात्र आपल्या खासगी बाबी सोशल मीडियावर टाकल्या तर त्या सार्वजनिक होतात. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भात जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे.- कपिल गरड

सोशल मीडियाचा अतिरेक

सोशल मीडियाच्या वापराविषयी काही जण अतिरेक करतानाही दिसतात. अगदी लहानसहान गोष्टीही शेअर केल्या जातात. लहान मुलांचेही चुकीचे फोटो-व्हिडीओ पोस्ट केले जातात. त्यामुळे कायद्याने चाप लागणार असेल तर ते योग्यच आहे.- जयश्री शर्मा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज