अ‍ॅपशहर

आशियाई क्रिकेटचा ज्वर

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे आशिया खंडातील तीन देश आले आहेत. त्यात बांगलादेशने छाप पाडली आहे. एकूणच आशिया खंडाचे क्रिकेटवरील वर्चस्व आणखी मजबूत झाले आहे.

Maharashtra Times 18 Jun 2017, 12:25 pm
चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे आशिया खंडातील तीन देश आले आहेत. त्यात बांगलादेशने छाप पाडली आहे. एकूणच आशिया खंडाचे क्रिकेटवरील वर्चस्व आणखी मजबूत झाले आहे. त्यामागे येथील क्रिकेटचे अर्थकारण, लोकप्रियता यांचा प्रभाव आहे, असे चाहते म्हणतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
आशियाई क्रिकेटचा ज्वर


बांगलादेशचा ठसा

भारतीय क्रिकेटमुळे एकूणच या खंडात मोठ्या प्रमाणावर पैसा आला आहे. बांगलादेश क्रिकेट पूर्वी रांगत होते ते आज स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहिले आहे. २०२३मधील वर्ल्डकपमध्ये बांगलादेश नक्कीच ठसा उमटवेल. फायनलही भारत-पाकिस्तान अशीच होणार आहे. - अमित डोंगरे

अर्थकारण फलदायी

भारतीय उपखंडात क्रिकेटचे प्रचंड मार्केटिंग झाले आहे. या खेळाची लोकप्रियताही त्यामुळे प्रचंड आहे. क्रिकेटची प्रसिद्धी, अर्थकारण याचा आलेख आशियात उंचावलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीतही या खंडातील संघांची प्राबल्य पाहायला मिळते.- डॉ. मनोज तंडे

भारताकडून प्रेरणा

भारतातील क्रिकेटला आलेले महत्त्व भारतीय उपखंडातील अन्य देशांना प्रेरणादायी ठरते आहे. त्यामुळेच पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांत गुणी खेळाडू येऊ लागले आहेत. आशियाई देशातील वाढती स्पर्धाही उपयुक्त आहे. त्यामुळे या देशांची ताकद वाढते आहे.- दीपक म्हापसेकर

बांगलादेशची भर

क्रिकेटमध्ये आशियाचे वर्चस्व होतेच, परंतु बांगलादेशमुळे या वर्चस्वात भर पडली आहे. त्यांच्याकडे गुणवत्तेची कमतरता नाही. क्रिकेट लोकप्रियतेमुळे त्यांच्याकडे क्रिकेटच्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि टी-२० लीगमुळेही चांगले माध्यम मिळाले आहे.- डॉ. समीरण उपासनी

क्रिकेट आशियाच्या हृदयात

क्रिकेट हा खेळ ब्रिटनमध्ये उदयास आला असला तरी आज आशिया खंडाच्या हृदयात त्याने स्थान मिळविले आहे. केवळ लोकप्रियता म्हणून नव्हे तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश येथे हा खेळ धर्मच बनला आहे. परिणामी, हे देश क्रिकेटमध्ये वरचढ ठरले आहेत.- अथर्व आपटे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज