अ‍ॅपशहर

‘बेस्ट’वर बोनसचा दबाव नको

बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनससाठी दिलेला संपाचा इशारा योग्य नाही. बेस्ट कमालीच्या तोट्यात असताना वेतन वेळेत मिळणे महत्त्वाचे असताना उपक्रमावर बोनसचा दबाव टाकणे योग्य वाटत नाही. बोनस देण्याच्या पद्धतीने बेस्टवर कर्जाचा बोजा आणखी वाढू शकतो. भ​विष्यात अशापद्धतीने उपक्रमाची आर्थिक ताकद अधिकच क्षीण होण्याची भीती आहे.

Maharashtra Times 14 Oct 2017, 2:23 am
बोनसपेक्षा बेस्ट वाचवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
‘बेस्ट’वर बोनसचा दबाव नको

बेस्टची प्रवासी संख्या बरीच कमी झाली आहे. बसेसचा दर्जाही चांगला नाही. एसी बसेसही सेवेत नाहीत. अशावेळी बेस्टचा प्रवासी आणखी कमी होत जाण्याचीही भीती आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांनी बोनससाठी आग्रही भूमिका न घेता उपक्रम वाचविण्यासाठी सहाय्य केले पाहिजे.- विलास सुद्रिक

निधी कुठून येणार?
प्रचंड आर्थिक तोटा असूनही कर्मचाऱ्यांना बोनस देणे वा त्यासाठी आंदोलनाचा इशारा देणे कितपत योग्य आहे, हे ठरवावे लागले. बोनसमुळे करदात्यांवर बोजा पडत असतो, याचाही विचार करायला हवा. बोनसची मागणी करताना उपक्रमाकडे त्यासाठी निधी कुठून येणार हा कूटप्रश्न आहे.- सुनील हिंगणकर

नफा झाल्यास बोनस द्या
बेस्ट उपक्रम पूर्णपणे खालावला असून अशातच सेवेविषयीही नाराजी आहे. एसी बसेसना अजूनही पर्याय मिळालेला नाही. बेस्ट या सेवा चालवित नसल्याबद्दल आश्चर्य वाटते. किमान आतातरी सेवा सुरू कराव्यात, नफा झाला तर बोनस देण्यास कोणीही विरोध करणार नाही.- योगेश कदम

भविष्यासाठी तरतूद करा
बेस्टचे प्रवासी कमी होत असताना उपक्रमाच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. अशावेळी बोनसपेक्षा भविष्यात ही सेवा कशी चालेल हे पाहायला पाहिजे. बोनसच्या आग्रहामुळे आर्थिक तरतुदीवरही विपरित परिणाम होतो.
- प्रकाश पडवळ

बोनस नको, सेवा द्या
बोनसची मागणी करताना सेवेबाबत विचार करायला हवा. नफ्याच्या अनुषंगाने बोनस देणे योग्य आहे. तोटा असताना बोनस देण्याची पद्धत कुठेही नाही. हे केवळ सरकारी वा महामंडळांमध्येच होते. त्यामागे कोणते धोरण हे समजू शकलेले नाही. बोनस देताना नफा-तोटा हे सूत्र राबवावे. - सचिन बागवे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज