अ‍ॅपशहर

अनाथांचे नुकसान

राज्य सरकारकडून अनुदान घेऊनही मुलांना सोयी न पुरवल्याचा ठपका ठेवत सरकारने २१४ बालगृहांची मान्यता रद्द केली आहे. यामुळे राज्यातील गोरगरीब आण‌ि अनाथ मुलांचे मोठे नुकसान होणार आहे. स्वयंसेवी संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची भीती सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.

Maharashtra Times 10 Nov 2017, 1:59 am
राज्य सरकारकडून अनुदान घेऊनही मुलांना सोयी न पुरवल्याचा ठपका ठेवत सरकारने २१४ बालगृहांची मान्यता रद्द केली आहे. यामुळे राज्यातील गोरगरीब आण‌ि अनाथ मुलांचे मोठे नुकसान होणार आहे. स्वयंसेवी संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची भीती सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public voice
अनाथांचे नुकसान

तीन महिन्यांनी तपासणी करा

बालगृहे सुरू करण्यामागील हेतू चांगला आहे. संस्थेला देणगीदारही मिळतात. सरकारी अनुदान मुलांपर्यंत पोहोचत नाही. ते कोणाच्या खिशात जाते, त्याची चौकशी करावी. प्रत्येक संस्थेची दर तीन महिन्यांनी तपासणी करा. - निरुता भाटवडेकर

लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तींच्या संस्था

बालगृह चालवणाऱ्या संस्थांचे संस्थाचालक लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांपैकी आहेत. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. अनुदानाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने या संस्था चालवल्या जातात. बालगृह ही अनाथ गरीब मुलांसाठी आहेत. - सुनील पवार

काळ्या यादीत टाका

ही बालगृहे स्वयंसेवी संस्थाच्या ताब्यात मोठ्या विश्वासाने दिली जातात. पण या संस्था आवश्यक सोयी सुविधा पुरवत नाहीत. यातील दोषी संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. अशा गैरप्रकारांमुळे स्वयंसेवी संस्थाची विश्वासार्हता धोक्यात येते. - मोरेश्वर कोरे

विश्वासार्हता जपावी

स्वयंसेवी‌ संस्थांनी त्याची विश्वासार्हता जपणे खूप गरजेचे असते. अनेक दानशूर संस्था स्वयंसेवी संस्थाना मोठ्या विश्वासाने वस्तू देतात. त्याचा योग्य विनियोग होणे गरजेचे आहे. अन्यथा गरीब मुलांना मदतीचे हात देण्यासाठी समाज पुढे येणार नाही. - नियती नेरूरकर

अनाथ मुलांचे नुकसान

राज्यातील तब्बल २१४ बालगृहांची मान्यता रद्द झाली, ही अतिशय चिंतेची बाब आहे. मोठ्या विश्वासाने सरकारने या संस्थांना अनुदान दिले आहे. पण त्यांनी मुलांना सोयी पुरवल्या नाहीत. यामध्ये गोरगरीब अनाथ मुलांचे मोठे नुकसान होणार आहे. - मीनल परब

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज