अ‍ॅपशहर

​ चल बसंती!

गेली बारा वर्षं माझी बाइक माझी सोबतीण आहे. मी तिला प्रेमाने ‘बसंती’ म्हणून हाक मारतो. माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि माझे विद्यार्थीसुद्धा तिला बसंतीच म्हणतात. आयुष्यातील सारे चढ-उतार माझ्या गाडीने माझ्यासोबत अनुभवले आहेत. आयुष्यातील यशाची शिखरे गाठताना, प्रवासात माझ्या बसंतीने मला सोबत दिली.

Maharashtra Times 22 Jun 2017, 12:38 am
वैभव बडंबे, दादर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम basani my love
​ चल बसंती!


गेली बारा वर्षं माझी बाइक माझी सोबतीण आहे. मी तिला प्रेमाने ‘बसंती’ म्हणून हाक मारतो. माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि माझे विद्यार्थीसुद्धा तिला बसंतीच म्हणतात. आयुष्यातील सारे चढ-उतार माझ्या गाडीने माझ्यासोबत अनुभवले आहेत. आयुष्यातील यशाची शिखरे गाठताना, प्रवासात माझ्या बसंतीने मला सोबत दिली. माझ्या मुलीच्या बालपणाची ती एक जिवंत साक्षीदार आहे. तुझ्यापेक्षा बसंतीवर अधिक प्रेम आहे म्हणून माझ्या पत्नीस वारंवार चिडवतो. अजूनही प्रवास करताना हिचा सहवास आपली काळजी घेणाऱ्या एका व्यक्तीचा आहे असा भास होतो. माझी गाडी माझी एक चांगली मैत्रीण आहे. कारण कधीही तिला चल बसंती... म्हटल्यास ती माझ्यासोबत फिरण्यास नकार देत नाही. अशी मैत्रीण मला फार आवडते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज