अ‍ॅपशहर

...अन् धाडस केलं

दुचाकी ऍक्टिवा चालवणं किती सोपं आहे, हे मी सर्वांना सांगत होतो. पण घरी येऊन दोन महिने होऊनही मला ती चालवताच आली नाही. निवृत्तीच्या वेळी मला बायकोने भेट म्हणून दिली. ती आता नाराज होणार ही सल सतत असायची. कितीजण मला शिकवायला आले. पण मला गाडी काही चालवायला जमलंच नाही.

Maharashtra Times 10 Mar 2017, 12:32 am
मुरारी लाड, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i dared to drive
...अन् धाडस केलं


दुचाकी ऍक्टिवा चालवणं किती सोपं आहे, हे मी सर्वांना सांगत होतो. पण घरी येऊन दोन महिने होऊनही मला ती चालवताच आली नाही. निवृत्तीच्या वेळी मला बायकोने भेट म्हणून दिली. ती आता नाराज होणार ही सल सतत असायची. कितीजण मला शिकवायला आले. पण मला गाडी काही चालवायला जमलंच नाही. अशाच एका सायंकाळी मित्रांबरोबर बसलो होतो. माझा मित्र पंकज (सुनील) पाडवी याला ही व्यथा सांगितली. तो हसतच म्हणाला,'काळजी सोडून द्या. मी तुम्हाला फक्त २० मिनिटात शिकवतो'. त्याच्या बोलण्याने मला हसायला आलं. मला तर त्याने आव्हानच केलं की, मी अपयशी ठरलो तर काहीही हरेन. माझा तर विश्वासच बसत नव्हता.
मग दुसऱ्याच दिवशी आम्ही उल्हासनगर येथे गेलो. एक उतरता (स्लोप) रस्ता पाहिला आणि तिथं गाडी उभी करून बंद केली आणि सांगितलं की, या बंद गाडीनेच १६ फेऱ्या मारायच्या. मी त्या बंद गाडीवर बसून उतारावर १६ फेऱ्या मारल्या. त्यासाठी त्याने गाडीचं तत्त्व सांगितलं की, ज्याला तोल सांभाळता आला तो गाडी शिकला. मी त्या बंद गाडीने तोल(बॅलन्स) सांभाळत १६ फेऱ्या मारल्या आणि मग त्याने गाडी स्टार्ट करायला सांगितली. काय आश्चर्य मी लगेच संपूर्ण तो नाजीकचा परिसर फिरून आलो. काय आनंद वर्णावा! वयाने माझ्यापेक्षा तो लहान असला तरी तो माझा ड्रायव्हिंगचा गुरु होता. मला साधी सायकल चालवता येत नव्हती आणि या वयात ही गाडी चालवता येईल की नाही शंका होतीच. दोन महिने जे जमलं नाही ते केवळ २० मिनिटात शक्य झालं. माझा दुसरा गुरु आहे जब्बार पठाण. त्याने मला ड्रायव्हिंगचे बारकावे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज