अ‍ॅपशहर

माझी लक्ष्मी

बाइक चालवण्याची आवड मला वयाच्या पंधराव्या वर्षांपासून निर्माण झाली. बाइक दुरुस्त करणं हीसुद्धा मला आवड असल्यामुळे माझी बाइक मी स्वतः दुरुस्त करतो. माझाकडे अनेक दुचाकी होत्या. सगळ्या प्रकारच्या बाइक चालवण्याचा माझा मानस आहे. सध्या मी चालवत आहे ती गाडी १५ वर्षं जुनी आहे.

Maharashtra Times 6 Jul 2017, 12:29 am
सुशील खवळे, बोरिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my lovely bike
माझी लक्ष्मी


बाइक चालवण्याची आवड मला वयाच्या पंधराव्या वर्षांपासून निर्माण झाली. बाइक दुरुस्त करणं हीसुद्धा मला आवड असल्यामुळे माझी बाइक मी स्वतः दुरुस्त करतो. माझाकडे अनेक दुचाकी होत्या. सगळ्या प्रकारच्या बाइक चालवण्याचा माझा मानस आहे. सध्या मी चालवत आहे ती गाडी १५ वर्षं जुनी आहे. त्या गाडीवरून मी मुंबई ते देवगड, मालवण, कोल्हापूर, लोणावळा असे अनेक लांबचे प्रवास केले. कधी माझ्या कुटुंबातील सदस्यांबरोबर तर कधी मित्र परिवारासमवेत अनेक सफरी केल्या. तिने मला कधीच दगा दिला नाही. माझी ती लक्ष्मीचं आहे. माझं बाइकवर खूप प्रेम आहे. स्वामींच्या कृपेमुळे आज माझा वयाच्या ६५ व्यावर्षी सुद्धा बाइक चालवून मी माझा आनंद द्विगुणित करतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज