अ‍ॅपशहर

केळ्याची पानगी

साहित्य दोन किंवा तीन पिकलेली केळी, एक वाटी शिंगाडा पीठ, १/३ वाटी किसलेला गूळ, १/२ लहान चमचा वेलची पूड, दोन मोठे चमचे तूप, ...

Maharashtra Times 19 Sep 2018, 9:13 am
आरती निजापकर, सायन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gharcha-chef


साहित्य

दोन किंवा तीन पिकलेली केळी, एक वाटी शिंगाडा पीठ, १/३ वाटी किसलेला गूळ, १/२ लहान चमचा वेलची पूड, दोन मोठे चमचे तूप, केळीची पानं

कृती-

प्रथम एका भांड्यात पिकलेल्या केळ्याचे काप करून घ्या, नंतर त्यात किसलेला गूळ, शिंगाड्याचं पीठ आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण मऊसर असावं म्हणजे पानगी छान होतात. आता केळीचं पान लहान गोलाकार कापून घ्यावं. त्यावर हाताच्या बोटांना तूप लावून मिश्रण थापून घ्यावं. थापून झाल्यावर त्यावर त्याच आकाराचं केळीचं पान ठेवावं. आता पॅनमध्ये झालेले पानगी ठेवून त्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यावं. पानगी दोन्ही बाजूंनी छान वाफवून घ्यावी. वाफवलेले पानगी तुपावर थोडं लालसर रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावं आणि वर गुळाचा खडा आणि केळ्याचे काप ठेवून सर्व्ह करावं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज