अ‍ॅपशहर

भाजणीच्या पिठाचे पॅटीस

साहित्य- दोन वाटी भाजणीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, दोन चमचे बेसन, दोन किसलेले बीट, दीड चमचे आले-लसूण पेस्ट, दोन उकडलेले बटाटे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, मीठ, तीळ, तेल.

Maharashtra Times 14 Mar 2018, 9:25 am
एकता भोसले, गोरेगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pattice


साहित्य- दोन वाटी भाजणीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, दोन चमचे बेसन, दोन किसलेले बीट, दीड चमचे आले-लसूण पेस्ट, दोन उकडलेले बटाटे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, मीठ, तीळ, तेल.

कृती- प्रथम सर्व पीठे एकत्र करून त्यात दही, हळद, लाल तिखट, गरम मसाला,किसलेले बीट,आल-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेले बटाटे, मीठ घालून मिश्रण एकत्र करावे त्यानंतर दोन चमचे तेल घालून मिश्रण मळून घ्यावे. याचे लहान गोळे करून त्यांना पॅटीसचा आकार द्यावा. त्यावर तीळ लावून तव्यावर तेल सोडून शॅलो फ्राय करून घ्यावे. त्यानंतर त्यावर बटर किंवा तूप लावून दह्या सोबत सर्व्ह करावं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज