अ‍ॅपशहर

​ झटपट ब्रेड रो

साहित्य- मध्यम आकाराचे दोन बटाटे, ६ ब्रेड स्लाइस, ४-५ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे पावडर, हळद आणि तेल

Maharashtra Times 30 Mar 2017, 12:53 am
स्वाती मानेगावकर, रसायनी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bread roll
​ झटपट ब्रेड रो


साहित्य- मध्यम आकाराचे दोन बटाटे, ६ ब्रेड स्लाइस, ४-५ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे पावडर, हळद आणि तेल
कृती- बटाटे उकडून घ्यावेत. ब्रेड मिक्सरमधून थोडा जाडसर वाटावा. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर हिरवी मिरची मिक्सरमधून थोडी जाडसर वाटून घ्यावी. उकडलेले बटाटे थंड झाल्यावर सोलून, कुस्करून एका ताटात ठेवावे. त्यात ब्रेडचा चुरा, मिक्सरमधून काढलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे पावडर, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालावं. लागल्यास थोडं पाणी शिंपडून हे मिश्रण चांगलं एकत्र करून, त्याचे लहान आणि लांबट आकाराचे रोल तयार करून गरम तेलात तळावे.
टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत गरम सर्व्ह करावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज