अ‍ॅपशहर

कुरकुरीत स्वीटकॉर्न पकोडे

साहित्य- एक कप स्वीटकॉर्न, अर्धा कप बेसन, १/४ कप तांदळाचं पीठ, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, ८ ते १० कढीपत्त्याची पानं चिरून, एक टीस्पून किसलेलं आलं, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल मिरची पावडर, १/४ टीस्पून ओवा, १/४ टीस्पून जिरे, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

Maharashtra Times 18 Jul 2017, 12:41 am
स्वरा खोत, मालाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crispy sweet corn pakora
कुरकुरीत स्वीटकॉर्न पकोडे


साहित्य- एक कप स्वीटकॉर्न, अर्धा कप बेसन, १/४ कप तांदळाचं पीठ, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, ८ ते १० कढीपत्त्याची पानं चिरून, एक टीस्पून किसलेलं आलं, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल मिरची पावडर, १/४ टीस्पून ओवा, १/४ टीस्पून जिरे, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृती- प्रथम स्वीटकॉर्न मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ते, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, मीठ, बेसन, तांदळाचं पीठ, आलं, जिरे व ओवा घालावा. हे सर्व एकत्र करुन घ्यावं. या मिश्रणात पाणी घालायची गरज नाही, कारण वाटलेल्या स्वीट कॉर्नना पाणी सुटतं. हे मिश्रण थोडं घट्टच असावं. तेल तापल्यावर त्यात चमच्याने किंवा हाताने मिश्रणाचे छोटे गोळे सोडावे व ते तळून घ्यावेत. हे पकोडे छान क्रिस्पी होतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज