अ‍ॅपशहर

ड्रायफ्रुट्स पान विडा

एक वाटी मैदा, काजू, बदाम, मगज इत्यादी ड्रायफ्रूट्स, छोटा चमचा वेलची पूड, पाव वाटी साखर, तेल किंवा तूप, चिमूटभर खाण्याचा हिरवा रंग, तेल.

महाराष्ट्र टाइम्स 5 Sep 2019, 10:39 am
रेखा आळंदकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dryfruits paan vida
ड्रायफ्रुट्स पान विडा


साहित्य : एक वाटी मैदा, काजू, बदाम, मगज इत्यादी ड्रायफ्रूट्स, छोटा चमचा वेलची पूड, पाव वाटी साखर, तेल किंवा तूप, चिमूटभर खाण्याचा हिरवा रंग, तेल.

कृती :
मैद्यामध्ये एक चमचा तेल टाकून पाण्यानं घट्ट मळून घ्या. मळताना थोडा हिरवा रंग पाण्यात कालवून मिक्स करा, म्हणजे पिठाला छान हिरवा रंग येईल. मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स आणि साखर एकत्र करून बारीक करून घ्या. त्यातच वेलची पूड टाका. मळलेल्या पिठाचा थोडा गोळा घेऊन पातळ पुरी लाटा. त्यास कोनासारखा आकार देऊन त्यात ड्रायफ्रुट्सचं सारण भरून तोंड बंद करून विड्यासारखा आकार द्या. असे सगळे विडे तयार करून तळा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज