अ‍ॅपशहर

पौष्टिक ग्रीक सलाड...

एखाद वेळेस जेवणाचा अजिबात मूड नसतो. अशावेळी सलाड हा एक चांगला आणि पौष्टिक पर्याय आहे. पाहा ग्रीक सलाडची हेल्दी रेसिपी...

Maharashtra Times 24 Jan 2017, 9:49 am
प्रज्योत सकपाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम greek salad
पौष्टिक ग्रीक सलाड...


साहित्य:
१ आइसबर्ग लेट्यूस, एका काकडीचे काप, १ रंगीत शिमला मिरची, १ लिंबू, ३-४ चिमूट पार्सली, ​ ६-७ चेरी टोमॅटोचे , ४-५ चमचे ऑलिव्ह ऑइल, १ कांदा, १०-१२ कापलेले ब्लॅक ऑलिव्हज, १ चमचा मिक्स हर्ब्स, ५० ग्रॅम फेटा चीझ, काळीमिरी पूड आणि चवीनुसार मीठ

कृती:
१. प्रथम एका बाऊलमध्ये आइसबर्ग लेट्युस घेऊन त्यामध्ये काकडीचे काप, चिरलेली रंगीत शिमला मिरची, चेरी टोमॅटो, चिरलेला कांदा, ब्लॅक ऑलिव्हज्, फेटा चीझ, मिक्स हर्ब्स, मीठ, काळीमिरी पूड, पार्सेली आणि ऑलिव्ह ऑइल असे सर्व साहित्य नीट एकत्र करून घ्या.
२. तयार सलाडवर कांदा, पार्सेली, लिंबाचा रस आणि चीझ सजावट करून डिश सर्व्ह करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज