अ‍ॅपशहर

पौष्टिक बाकरवडी

साहित्य- कणिक, मका पीठ, मका दाणे, बेसन पीठ, धणे-जिरे पूड, लसूण-आलं पेस्ट, चिंच- खजूर चटणी, तेल, बीट, शेव, हिरवे मूग

Maharashtra Times 27 Apr 2017, 12:36 am
भाग्यश्री रासने, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम healthy bakarwadi
पौष्टिक बाकरवडी


साहित्य- कणिक, मका पीठ, मका दाणे, बेसन पीठ, धणे-जिरे पूड, लसूण-आलं पेस्ट, चिंच- खजूर चटणी, तेल, बीट, शेव, हिरवे मूग
कृती- कणीक, मका पीठ, बेसन पीठ घेऊन त्यात गरजेनुसार मीठ, आलं-लसूण पेस्ट आणि तेलाचं मोहन घालून घट्टसर पीठ मळून घ्या. सारणात वाफवलेले हिरवे मूग, मका दाणे जाडसर वाटून हे मिश्रण कढईतील थोड्या तेलावर परतून घ्या व त्यात मीठ, तिखट, बीटाचे तुकडे, धणे-जिरे पूड मिक्स करा. तयार पिठाची पोळी लाटून त्यावर चिंच-खजूर चटणी लावून त्यावर तयार सारण व शेव घालून त्याचे रोल करा. साधारण १५ मिनिटं हे रोल वाफवून घ्या. रोल थंड झाल्यावर त्याचे काप करून गरम तेलात तळून घ्या. अशा प्रकारे बाकरवडी खाण्यास तयार असून ती चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
टीप- सारणासाठी सलाड कोणतंही वापरू शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज