अ‍ॅपशहर

पौष्टिक रवा इडली

साहित्य- १ कप रवा, २ मिरच्या, ५ ते ६ काजू, १ बारीक कापलेलं गाजर, १ कप घोटलेले दही, पाणी (गरजेनुसार), चवीपुरतं मीठ, १ टिस्पून सोडा

Maharashtra Times 10 Mar 2017, 12:30 am
प्रगती पाटील, भाईंदर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम healthy rava idli
पौष्टिक रवा इडली


साहित्य- १ कप रवा, २ मिरच्या, ५ ते ६ काजू, १ बारीक कापलेलं गाजर, १ कप घोटलेले दही, पाणी (गरजेनुसार), चवीपुरतं मीठ, १ टिस्पून सोडा
फोडणीकरता- १ टिस्पून तेल, चिमूटभर मोहरी, चिमूटभर हिंग, १/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ ते १ टिस्पून चणाडाळ, ४-५ कढीपत्त्याची पानं
कृती: मध्यम आचेवर, कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेली मिरची घालावी. मग चणाडाळ घालून परतावं आणि थोडा रंग बदलला की उडीद डाळ, बारीक कापलेलं गाजर आणि काजू घालावेत. उडीद डाळीचा आणि काजूचा रंग गुलाबीसर झाला की कढीपत्त्याची पानं घालावीत आणि त्यावर १ कप रवा घालून २ ते ३ मिनिटं मध्यम आचेवर भाजावं. भाजलेला रवा एका खोलगट भांड्यात काढून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात घोटलेलं दही आणि पाणी मिक्स करून त्याचं घट्टसर ताक बनवावं. रवा थोडा कोमट झाला की त्यात हे ताक घालावं. चवीपुरतं मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावं. मिक्स करून २० ते ३० मिनिटं तसंच ठेवावं. पीठ खूप घट्ट किंवा पातळ नसावं. इडली कुकरमध्ये तळाला साधारण दीड इंच पाण्याची पातळी ठेवावी आणि पाणी गरम करण्यास ठेवावं. इडली पात्राला तेलाचा किंचीत हात लावून घ्यावा. मिश्रणात सोडा घालून एकाच दिशेने मिक्स करावं आणि मिश्रण इडली पात्रात भरावं. पाण्याला उकळी फुटली की इडली स्टँड कुकरमध्ये ठेवून १२ ते १५ मिनिटं इडल्या वाफवाव्यात. ८ ते १० मिनिटं वाफ जिरल्यावर कुकर उघडून इडल्या चमच्याच्या टोकाने व्यवस्थित सोडवून घ्याव्यात. शेंगदाणे किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज