अ‍ॅपशहर

इडली स्टफ्ड इन मिरची

इडली हा जरी दाक्षिणात्य खाद्यपदार्थ असला तरी भारताच्या बहुतांश भागात इडलीनं नाश्त्यात महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे. याच इडलीत थोडाफार बदल करुन वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्याही बनवल्या जातात. अशाच एका वेगळ्या इडलीची ही पाककृती...

Maharashtra Times 22 Jan 2019, 8:19 am
दिप्ती गुंडये, वरळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम idali-stuff

इडली हा जरी दाक्षिणात्य खाद्यपदार्थ असला तरी भारताच्या बहुतांश भागात इडलीनं नाश्त्यात महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे. याच इडलीत थोडाफार बदल करुन वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्याही बनवल्या जातात. अशाच एका वेगळ्या इडलीची ही पाककृती...

साहित्य- सिमला मिरची, मक्याचे दाणे, गाजर, बटाटा, चीज, तयार इडलीचं पीठ, तिखट, मीठ, कांदा

कृती- प्रथम तेलात कांदा आणि मक्याचे दाणे वाफवून घ्या. त्यात उकडून कुस्करलेला बटाटा आणि गाजराचा कीस घाला. चवीनुसार तिखट, मीठ आणि हवं असल्यास चीज घालून सारण तयार करा. सिमला मिरचीचे गोल काप करा आणि त्यातील बिया काढून घ्या. आता इडलीपात्राला तेल लावून त्यात सिमला मिरचीचे काप ठेवा. त्यात इडलीचं तयार पीठ थोडं घाला. नंतर सारण भरा आणि परत इडलीचं पीठ घाला. आता हे पंधरा मिनिटं वाफवून घ्या. तयार भरली सिमला इडली तव्यावर थोडं तेल टाकून भाजून घ्या आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज