रुपाली वैयंगणकर
साहित्य- सात इडल्या, बारीक चिरलेले दोन कांदे, बारीक चिरलेले दोन टोमॅटो, एक सिमला मिरची, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे आणि जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार, टोमॅटो आणि चिली सॉस, चीज, बटर आणि तेल गरजेप्रमाणे.
कृती- प्रथम एक भांडं गॅसवर ठेवून त्यात थोडे तेल घाला. तेल गरम झालं की, कांदा परतून घ्यावा. कांद्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतवा. नंतर टोमॅटो शिजवून घ्या. मग त्यात सिमला मिरची घालून सर्व मिश्रण एकत्र शिजवा. आता त्यामध्ये मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि धणे-जिरेपूड घालून थोडा वेळ शिजवून घ्या. अशा प्रकारे पिझ्झ्याची भाजी तयार आहे. आता टोमॅटो आणि चिली सॉस एकत्र करून घ्या. नंतर एका पॅन गरम करून बटर घाला. त्यामध्ये इडल्या ठेवा आणि त्यावर
सॉसचं मिश्रण लावून मग तयार केलेली भाजी पसरवा. वर चीज किसून टाका आणि झाकण ठेवून चीज वितळेपर्यंत गरम करा. अशा प्रकारे इडली पिझ्झा तयार आहे. गरमा गरम सॉस बरोबर सर्व्ह करा.