ऋतुजा गवस, नवी मुंबई
साहित्य- पाव किलो मैदा, एक वाटी किसलेलं सुकं खोबरं, थोडी खसखस, पांढरे तीळ, साखरेचा पाक, तेल.
कृती- एक चमचा गरम तेल घालून मैद्याचं पीठ आणि मीठ चवीपुरतं घालून मऊसर मळून घ्या. आता साखरेचा पाक करुन घ्या. नंतर सुकं खोबरं थोडंसं भाजून घ्या आणि त्यात थोडीशी खसखस आणि तीळ घाला. लालसर होईपर्यंत भाजू नये. नंतर हे सारण बाजूला ठेवा. आता मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्या आणि कढईतील गरम तेलात सोडा. तेलात टाकताच पुरी फुगली की लगेच दुमडून घ्या आणि बाजूला काढा. तळलेल्या पुऱ्या साखरेच्या पाकात पूर्ण घोळवून सर्व्ह करा. त्यावर सुकं खोबरं, खसखस आणि तीळ मिश्रित सारण घाला. अशा या मखमली पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत.