अ‍ॅपशहर

मटारच्या पौष्टिक शंकरपाळ्या

तिखट, मीठाच्या, गोड अशा अनेक चवींच्या शंकरपाळ्यांचा आस्वाद आपण घेतला असेलच. पण आता करून पाहा, मटारच्या पौष्टिक शंकरपाळ्या...

Maharashtra Times 21 Jan 2017, 3:09 pm
नीलिमा भोईर, अणुशक्तीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम matar shankarpali
मटारच्या पौष्टिक शंकरपाळ्या


साहित्य:
पाव किलो मटार, एक वाटी रवा, एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, मैदा, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा मिरचीपूड, एक चमचा जिरे, आवश्यकतेनुसार मीठ

कृती:
१. प्रथम मटारचे दाणे मिक्सरमधून काढून घ्यावेत.
२. त्यानंतर एका परातीत सर्व पीठं एकत्र करुन त्यात इतर साहित्यही मिसळावे.
३. त्यात वाटलेले मटार घालावेत.
४. एका मोठ्या चमच्यामध्ये तेल गरम करून ते पीठात घालावे.
५. पीठ चांगले मळून घ्यावे.
६. मग एक-एक गोळा पातळ लाटून शंकरपाळ्याच्या आकार द्यावा.
७. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर तळावेत.
८. थंड झाल्यावर कुरकुरीत शंकरपाळी चहासोबत सर्व्ह कराव्यात,

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज