वीणा रूक्मांगद, चेंबूर
दिवाळी जवळ येऊ लागली की, बहुतांश घरामध्ये भाजणीच्या चकल्या बनतात. तसंच चकली हा फराळामधील विशेष आवडीचा पदार्थ असतो. पण कांद्याची चकली जरा वेगळीच आणि चविष्ट लागते. शिवाय करायला पण अगदी सोपी असतो. त्यामुळे कांद्याच्या चकलीची पाककृती पुढीलप्रमाणे...
साहित्य- दोन मध्यम आकाराचे कांदे, दोन वाट्या चकलीचे भाजणी पीठ, हळद, तिखट, मीठ, तीळ, ओवा, हिंग, धणे-जिरे, पावडर, तेल.
कृती- प्रथम दोन वाट्या चकलीची भाजणी घ्या. त्यात दोन कांदे किसून घाला. नंतर त्यात हळद, तिखट, मीठ, तीळ, ओवा, हिंग, धणे-जिरे, पावडर आणि एक चमचा गरम तेलाचं मोहन घाला. सर्व एकत्र करून त्यात थोडं कोमट पाणी घाला. नंतर पिठाचा घट्टसर गोळा करून चकल्या पाडा. गरम तेलात मंद आचेवर चकल्या तळा. तळून काढल्यानंतर टिशू पेपरवर ठेवा. जेणेकरुन त्यातील जास्तीचं तेल टिशू पेपरमध्ये शोषलं जाईल. अशा या चकल्या अतिशय खुसखुशीत आणि चवीला स्वादिष्ट लागतात. गरम चकली दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.