अर्चना दीक्षित
साहित्य- ८-१० पालक रोटी, १ गाजर, १ कांदा, १-१ लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, थोडे मक्याचे दाणे, मीठ, तेल, तिखट, हळद, जिरं, धणे पूड, कोथिंबीर
कृती- प्रथम पालक रोटीचे लांब-लांब काप करून घ्या. नंतर सर्व भाज्या उभ्या चिरून घ्या. एका कढईमध्ये तेल घालून फोडणी करावी. जिरं घातल्यावर कांदा छान परतून घ्यावा. मग त्यात गाजर घालून थोडं शिजवून घ्या. नंतर १-१ करत भाज्या घालून आणि मक्याचे दाणे घालून शिजवून घ्या. यात हळद, तिखट, धणे पूड घालून मीठ चवीनुसार घाला. त्यानंतर पालक रोटीचे लांब लांब काप घालून हलक्या हाताने परतून घ्या. सर्वात शेवटी कोथिंबीर पसरवून गरम-गरम खायला सर्व्ह करा. मुलांच्या डब्यातही हे आपण देऊ शकतो.