अ‍ॅपशहर

​ पोटॅटो पॉकेट अन् ब्रेडक्रम्ब रोल

साहित्य- दोन बटाटे उकडलेले, एक कांदा बारीक चिरलेला, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चार ब्रेड स्लाइस (त्याच्या कडा काढून घ्या), एक चमचा कॉर्नफ्लोअर टोमॅटो सॉस

Maharashtra Times 16 Nov 2017, 12:56 am
सिद्धेश ताम्हणकर, अंधेरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम potato pocket
​ पोटॅटो पॉकेट अन् ब्रेडक्रम्ब रोल


एकाच साहित्यापासून झटपट तयार होणाऱ्या दोन पाककृती आहेत.
साहित्य- दोन बटाटे उकडलेले, एक कांदा बारीक चिरलेला, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चार ब्रेड स्लाइस (त्याच्या कडा काढून घ्या), एक चमचा कॉर्नफ्लोअर टोमॅटो सॉस
पोटॅटो पॉकेटची कृती- सर्वात प्रथम उकडलेले बटाटे कापून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल तापवून त्यात जिरे, मोहरी, थोडं हिंग आणि आले-लसूण पेस्ट टाकून परतावं. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतून त्यात थोडं मीठ, हळद, आणि थोडं लाल तिखट घालून परता त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालावी. त्यानंतर कापलेले बटाटे घालावे आणि हे मिश्रण परतावं. त्यानंतर वरून कोथिंबीर घालून परतून घ्या. हे सारण तयार झाल्यावर बाजूला थंड होण्यासाठी ठेवावं. त्यानंतर ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर थोडं पाणी लावून लाटण्याने लाटून घ्या. त्या नंतर थंड झालेलं सारण त्यात भरून त्याच्या कडांना कॉर्नफ्लोअरच पाणी लावून त्यावर दाब देऊन पॉकेट सारखं तयार करा.
ब्रेडक्रम्ब रोल कृती- आता ब्रेडक्रम्ब रोल तयार करण्यासाठी सर्वात सोप्पी प्रक्रिया आहे. ब्रेडच्या कापलेल्या कडा मिक्सरला लावून त्याचे ब्रेडक्रम्ब तयार करा. त्यानंतर तयार बटाट्याचं सारण त्याचे रोल तयार करून कॉर्नफ्लोअरच्या पाण्यात बुडवून त्याला ब्रेडक्रम्ब लावा. कढईमध्ये तेल तापवून एकत्रित दोन्ही पदार्थ खरपूस तळून घ्या. नंतर टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत प्लेटमध्ये सर्व्ह करा.
टीप: ब्रेड तेल खेचू नये त्यासाठी त्यावर पाणी शिंपडावे आणि मग तो लाटावा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज