अ‍ॅपशहर

बेसनाच्या चविष्ट कुरडया

साहित्य- दीड वाटी बेसन, दोन वाट्या पाणी, अर्धा वाटी ताक, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद.फोडणीकरीता- एक चमचा तेल, मोहरी, जिरे, एक चमचा तिखट.कृती- प्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, पाणी आणि ताक टाकून छान मिक्स करुन घ्या. ​

महाराष्ट्र टाइम्स 16 May 2019, 8:41 am
किरण नांदगावकर, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम recipe besan kurdai
बेसनाच्या चविष्ट कुरडया


साहित्य- दीड वाटी बेसन, दोन वाट्या पाणी, अर्धा वाटी ताक, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद.
फोडणीकरीता- एक चमचा तेल, मोहरी, जिरे, एक चमचा तिखट.

कृती- प्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, पाणी आणि ताक टाकून छान मिक्स करुन घ्या. मिश्रणामध्ये गुठळी होऊ देऊ नका. नंतर तयार मिश्रण एका नॉनस्टीक कढईमध्ये घेऊन ती गॅसवर ठेवून मिश्रण सतत ढवळा. मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या आणि त्यानंतर पाच ते सात मिनिटं मंद आचेवर मिश्रण वाफवून घ्या. वाफवल्यानंतर मिश्रण गरम असतानाच शेव यंत्रात टाका. तेल लावलेल्या ताटामध्ये कुरडया पाडून घ्या. त्या पूर्ण थंड झाल्यानंतरच सर्व्ह करा.

सर्व्हींग टीप- दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये थोडी मोहरी, जिरे आणि एक चमचा तिखट टाकून फोडणी तयार करुन घ्या. बेसनाच्या कुरडया सर्व्ह करताना त्यावर एक छोटा चमचा ही फोडणी घाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज