अ‍ॅपशहर

कुरकुरीत खजूर बिस्कीट बर्फी

कृती- प्रथम खजूरमधील बी काढून त्याचे बारीक तुकडे करा. नंतर गॅसवर कढईत तूप घालून गरम करून त्यात खजूर तुकडे आणि कॉफी पावडर घालून मंद आचेवर खजूर नरम होईपर्यंत परतवा. मग थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हलकंच एक-दोन वेळा फिरवून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स 22 May 2019, 8:17 am
लता धनापुरे, पवई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम recipe khajur biscuit burfi
कुरकुरीत खजूर बिस्कीट बर्फी


साहित्य- खजूर, सहा बिस्कीटं, एक चमचा तूप, कॉफी पावडर.

कृती- प्रथम खजूरमधील बी काढून त्याचे बारीक तुकडे करा. नंतर गॅसवर कढईत तूप घालून गरम करून त्यात खजूर तुकडे आणि कॉफी पावडर घालून मंद आचेवर खजूर नरम होईपर्यंत परतवा. मग थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हलकंच एक-दोन वेळा फिरवून घ्या. नंतर हे मिश्रण परत थोडं कढईत टाकून गरम करून घ्या आणि एका फॉइलवर किंवा प्लेटमध्ये काढून मिश्रण गरम असेपर्यंत त्याचे छोटे गोळे करून ते पुरीसारखे बिस्कीटच्या आकारापेक्षा थोडे मोठे लाटा. आता खजूर मिश्रणाच्या एका पुरीवर बिस्कीट, त्यावर परत खजूर पुरी, परत बिस्कीट, परत खजूर पुरी परत बिस्कीट असे सात थर लावून घ्या. आता बाजूला आलेल्या खजूर पुऱ्यांचे भाग नीट दाबून घ्या आणि ते एका डब्यात ठेवून फ्रीजमध्ये दोन तास ठेवा. नंतर फ्रीजमधूल काढून ते सर्व्ह करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज