रुपाली नरवडे, शिंगोटे
साहित्य- एक वाटी सोयाबीन, एक चमचा कॉर्नफ्लोर, एक वाटी तांदळाचं पीठ, दोन चमचे बारीक चिरलेला लसूण, एक चमचा आलं बारीक चिरलेलं, एक वाटी उभा चिरलेला कांदा, एक वाटी मोठे मोठे तुकडे केलेली सिमला मिरची, तीन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा सोया सॉस, एक चमचा टोमॅटो सॉस, अर्धा छोटा चमचा तिखट, मीठ, तेल
कृती- गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घालून तीस मिनिटानंतर सोयाबीनमधील पाणी काढून ते कोरडे करून घ्यावेत. नंतर एका वाटीत कॉर्नफ्लोर आणि तांदळाचं पीठ एकत्र घेऊन त्यात मीठ आणि तिखट घालून एकत्र करून घ्यावं. नंतर संपूर्ण पाणी काढून घेतलेले सोयाबीन त्या पिठात टाकून मिक्स करून घ्यावे. दुसरीकडे कढईमध्ये सोयाबीन तळण्यासाठी तेल तापायला ठेवावं. त्यात सोयाबीन तळून ते बाजूला काढून ठेवावेत. उरलेल्या थोड्या तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालून छान परतवून घ्यावं. नंतर त्यात मिरचीचे उभे तुकडे करून घालावेत. उभा चिरलेला कांदा एक-एक भाग वेगवेगळा करून, त्यात सिमला मिरचीचे तुकडे घालून छान परतवून घ्यावं. आता सोया आणि टोमॅटो सॉस घालून मिश्रण चांगलं मिक्स करावं. थोडं तिखटही घालावं. सोयाबीन तळून झाल्यानंतर जे तांदळाचं आणि कॉर्नफ्लोरचं पीठ उरलेलं असेल त्यात थोडं पाणी घालून त्याला फोडणी द्यावी. या ग्रेव्हीला पाच मिनिटं उकळावं. नंतर त्यात तळलेले सोयाबीन टाकून मिक्स करून एक वाफ काढावी आणि सर्व्ह करावं.