अ‍ॅपशहर

विड्याच्या पानांची खीर

श्रावण-भाद्रपद आले की, पूजेसाठी विड्याची पानं घरात येतातच. एवढ्या पानांचं नंतर काय करायचं असा प्रश्न मग निर्माण होतो. पूजेसाठी लागणाऱ्या या विड्याच्या पानांचा पोटपुजेसाठी सुद्धा छान उपयोग होतो. तर मग विड्याच्या पानांची खिरेची पाककृती पुढीलप्रमाणे...

Maharashtra Times 23 Aug 2017, 12:47 am
शुभांगी संजीव फडके
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vidyacha panachi kheer
विड्याच्या पानांची खीर

श्रावण-भाद्रपद आले की, पूजेसाठी विड्याची पानं घरात येतातच. एवढ्या पानांचं नंतर काय करायचं असा प्रश्न मग निर्माण होतो. पूजेसाठी लागणाऱ्या या विड्याच्या पानांचा पोटपुजेसाठी सुद्धा छान उपयोग होतो. तर मग विड्याच्या पानांची खिरेची पाककृती पुढीलप्रमाणे...

साहित्य: विड्याची लहान कोवळी आठ-दहा पाने, अर्धा लीटर दूध, सव्वा वाटी साखर, अर्धी वाटी भाजलेला मध्यम रवा, वेलची पावडर, आवडीप्रमाणे बारीक केलेले ड्रायफ्रूट.

कृती: प्रथम विड्याची पानं कापून, ती मिक्सरमधून बारीक करून घ्यावीत. दूध तापत ठेवून गरम झाल्यावर त्यात वाटलेली विड्याच्या पानांची पेस्ट घालावी. ते उकळू लागल्यावर त्यात साखर घालावी. साखर विरघळली की, थोडा-थोडा रवा घालत, मिश्रण ढवळत राहावं. खीर साधारण घट्ट सर झाली की, गॅस बंद करून त्यात वेलची पावडर घालावी. आवडत असल्यास बारीक केलेले ड्रायफ्रूट घालू शकतो. या खिरीला सुंदर पिस्ता कलर येतो व पानांचा स्वादही छान लागतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज