अ‍ॅपशहर

कलिंगड मोहितो

रखरखत्या उन्हाळ्यची दाहकता कमी करण्यासाठी विविध थंड पेयांचा आस्वाद आपण घेत असतो. म्हणून आज कलिंगड मोहितोची पाककृती खास 'मुंटा'च्या वाचकांसाठी...

महाराष्ट्र टाइम्स 22 Apr 2019, 11:04 am
आरती निजापकर, सायन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम watermelon mojito recipe
कलिंगड मोहितो


रखरखत्या उन्हाळ्यची दाहकता कमी करण्यासाठी विविध थंड पेयांचा आस्वाद आपण घेत असतो. म्हणून आज कलिंगड मोहितोची पाककृती खास 'मुंटा'च्या वाचकांसाठी...

साहित्य- दोन ते तीन कप कलिंगडाचे बारीक तुकडे, एका लिंबाचा रस, एक लहान चमचा मध, दोन ते तीन पुदिन्याची पानं, दोन ते तीन थेंब आल्याचा रस, सोडा, क्रश केलेला बर्फ

कृती- मिक्सरच्या भांड्यामध्ये कलिंगडाचे तुकडे, मध आणि लिंबाचा रस घालून फिरवून घ्या. त्याचं अगदी पातळ मिश्रण झालं पाहिजे. आता काचेचा ग्लास घ्या. त्यात सर्वात खाली पुदिन्याची पानं आणि आवश्यकतेनुसार मध घाला किंवा साखर घाला. आता अर्धा ग्लास भरेल इतकी कलिंगडाची पेस्ट घाला. त्यावर क्रश केलेला बर्फ, आल्याचा रस घाला. मग वरून क्लब सोडा घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. वरून कलिंगडाचे लहान तुकडे घाला. नंतर लिंबाचा गोलाकार तुकडा आणि पुदिन्याच्या पानानं सजावट करा. अशा प्रकारे कलिंगड मोहितो तयार असून त्याचा आस्वाद घ्या.

टीप- बर्फ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं फिरवून मग पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवा. म्हणजे बर्फाचं पाणी होणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज