अ‍ॅपशहर

गप्पांची रंगली मैफल

आम्ही परळच्या के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९९८ बॅचचे विद्यार्थी आहोत. पुन्हा अठरा वर्षांनी आमचा मित्र गौरव एकल याने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. त्याच माध्यमातून स्नेहसंमेलन करण्याचं ठरलं. यासाठी आमचे मित्र उमेश हिंदळेकर, संदिप लाळगे, अपूर्व जाधव, लक्ष्मीकांत आचरेकर, राकेश नेराळे आणि अन्य मित्रांची तयारी सुरू झाली. एरवी कामानिमित्त नेहमीच व्यस्त असणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींचा उत्साह कमालीचा होता.

Maharashtra Times 24 Jan 2017, 12:07 am
अदिती परब-कांबळी, परळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम friendship
गप्पांची रंगली मैफल

आम्ही परळच्या के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९९८ बॅचचे विद्यार्थी आहोत. पुन्हा अठरा वर्षांनी आमचा मित्र गौरव एकल याने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. त्याच माध्यमातून स्नेहसंमेलन करण्याचं ठरलं. यासाठी आमचे मित्र उमेश हिंदळेकर, संदिप लाळगे, अपूर्व जाधव, लक्ष्मीकांत आचरेकर, राकेश नेराळे आणि अन्य मित्रांची तयारी सुरू झाली. एरवी कामानिमित्त नेहमीच व्यस्त असणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींचा उत्साह कमालीचा होता.
ठरल्याप्रमाणे आमचं स्नेहसंमेलन आमच्या शाळेतच पार पडलं. या कार्यक्रमासाठी आमच्या बॅचच्या तोरणे मॅडम आणि कुलकर्णी मॅडम उपस्थित होत्या. आमच्या बॅचचे सुशांत सतविडकर, उमेश कांबळे, मयूर परब, संदिप वराडकर, कुणाल काळे ही मंडळी बऱ्याच वर्षांनी भेटली. सर्व मित्रमैत्रिणींच्या गप्पांचा ओघ चालूच होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या दिवशी भारतीय लष्करात असलेला आमचा मित्र सुरज सुर्वे त्याच्या कर्तव्यामुळे हजर राहू शकला नाही. मात्र त्याला आम्ही या कार्यक्रमाचे फोटो पाठवले. निरोपाचा क्षण मात्र परत कधी भेटायचं या प्रश्नाने संपला असला तरीही शिरोडकर १९९८चा हा कट्टा असाच चालू राहील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज