अ‍ॅपशहर

मैत्रीचा वृक्ष असाच बहरु दे!

मी ३१ जानेवारी, १९९७ रोजी शाळेतून मुख्याध्यापिका या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्या दिवसापासून मी व माझी मैत्रीण मीनाक्षी दिवेकर रोज संध्याकाळी नियमितपणे (सुभाष मैदान कल्याण) फिरावयास जाऊ लागलो. मैदानात फेऱ्या मारून गप्पा मारत बसू लागलो. काही दिवस गेल्यानंतर आमच्यासारख्याच एकेक जणी तिथं येऊ लागल्या व त्यांच्याशी इतकी घट्ट मैत्री कधी झाली, हे कळलंच नाही.

Maharashtra Times 22 Sep 2017, 12:04 am
अंजली आठवले, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम friendship
मैत्रीचा वृक्ष असाच बहरु दे!


मी ३१ जानेवारी, १९९७ रोजी शाळेतून मुख्याध्यापिका या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्या दिवसापासून मी व माझी मैत्रीण मीनाक्षी दिवेकर रोज संध्याकाळी नियमितपणे (सुभाष मैदान कल्याण) फिरावयास जाऊ लागलो. मैदानात फेऱ्या मारून गप्पा मारत बसू लागलो. काही दिवस गेल्यानंतर आमच्यासारख्याच एकेक जणी तिथं येऊ लागल्या व त्यांच्याशी इतकी घट्ट मैत्री कधी झाली, हे कळलंच नाही.
कालांतराने दोन फांद्याचा मोठा वृक्ष तयार झाला. त्यातील एक फांदी गळून गेली. मला आई म्हणणाऱ्या व अंधारात ज्योत प्रज्वलित करणाऱ्या व दरवर्षी चैत्र महिन्यात कैरी डाळ व पन्हे कट्ट्यावर घेऊन येणाऱ्या ज्योती नाफडे आम्हाला एकाकी सोडून गेल्या. बायपास सर्जरी झाली असल्यामुळे चालताना धाप लागणाऱ्या, पण मैत्रीच्या ओढीने फिरावयास येणाऱ्या नलिनी कुलकर्णी, मैदानात जर स्पर्धा (चालण्याच्या) ठेवल्या तर सर्वांना मागे टाकून पुढे असणाऱ्या कांचन खांबेकर, हसरे व्यक्तिमत्व असलेल्या व नातलगांकडे धार्मिक कार्यक्रम सण समारंभ असल्यास मदतीला धावणाऱ्या मनिषा आंबेकर या सगळ्या माझ्या मैत्रिणींच्या परिवारात सामील आहेत.
निरपेक्ष बुद्धीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या, टाकाऊ वस्तूतून नवीन वस्तू बनवणाऱ्या व सफाईदार शिवण शिकवणाऱ्या सुनीता वझे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी येईपर्यंत माझी वाट पाहणाऱ्या, सर्वांची आस्थेने चौकशी करणाऱ्या शांत व प्रेमळ मनिषा कोरडे अतिशय चांगल्या आहेत. नावाप्रमाणेच स्मित हास्य करून गोड व हळू आवाजात बोलणाऱ्या, वयाची सत्तरी ओलांडली तरी स्वतःचं शिवण सफाईने शिवणाऱ्या स्मिता वेलणकर म्हणजे मज्जेशीर व्यक्तीमत्व आहे. जुनी गाणी व कविता यांचा खजिना असणाऱ्या निर्मला साठे, नातींवर अतिशय प्रेम असणाऱ्या सुमती काळे आणि प्रसंगानुरूप म्हणींचा वापर करणाऱ्या वसुंधरा पाटे या सगळ्याजणींची साथ मोलाची आहे.
घरात एकट्याच राहत असल्यामुळे व थोडासा भित्रा स्वभाव असल्यामुळे अंधार व्हायच्या आत घरी जाणाऱ्या वसुधा खांबेकर अशा आम्ही बारा जणी एकमेकींचे वाढदिवस साजरे करतो. आम्ही भिशी चालू केली आहे. सर्व मैत्रिणी सत्तरीच्या जवळपास असल्यामुळे संसारिक जबाबदारीतून मुक्त आहेत. त्यामुळे सर्वजणी मनमोकळ्या गप्पा मारत असतात. त्यामध्ये एकमेकींची उणीदुणी काढणं, यात कोणालाही रस नसतो. या वृक्षावरील फांद्या रोज संध्याकाळी एकत्र येवोत व गप्पा, गोष्टी, हास्य, विनोद, खाऊ, गाणी, निर्मळ प्रेम, ओढ हे सर्व असंच निरंतर राहो हीच मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज