अ‍ॅपशहर

मैत्रीपूर्ण क्षणभर विश्रांती

माझ्या मते सामाजिक उपक्रमात भाग घेणं म्हणजे विविध घटकांना जाणून घेत त्यांना आपल्या आयुष्यातील सामील करून घेणं. तसंच रोजच्या कामातून स्वःताला बाजूला सारत मला काही नवीन समृध्द अनुभव देणारं काही तरी करायचं होतं. म्हणूनच मी 'क्षणभर विश्रांती' या ग्रूपमध्ये सामील झाले. खरं म्हणायचं तर या गोष्टीची सुरुवात ग्लोबल मालवणी कट्टा या संस्थापासून झाली.

Maharashtra Times 20 Dec 2016, 12:25 am
निशिगंधा पाटकर, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nishigandha patkar telling us about her friends
मैत्रीपूर्ण क्षणभर विश्रांती

माझ्या मते सामाजिक उपक्रमात भाग घेणं म्हणजे विविध घटकांना जाणून घेत त्यांना आपल्या आयुष्यातील सामील करून घेणं. तसंच रोजच्या कामातून स्वःताला बाजूला सारत मला काही नवीन समृध्द अनुभव देणारं काही तरी करायचं होतं. म्हणूनच मी 'क्षणभर विश्रांती' या ग्रूपमध्ये सामील झाले. खरं म्हणायचं तर या गोष्टीची सुरुवात ग्लोबल मालवणी कट्टा या संस्थापासून झाली. त्यातील प्रसाद पवार, सतीश गुजर, एकनाथ दुधवडकर, लक्ष्मण सरमळकर यांनी मिळून तरुणांसाठी 'क्षणभर विश्रांती' ग्रूप बनवल्याचं मला समजलं. या अंतर्गत सगळ्यात आधी त्यांनी दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. या गँगमध्ये तुलनेत माझी जरा उशिराच एंट्री झाली. त्यांच्यामुळे मैत्रीदिनाला माझ्यात नव्या विचारांची सुरूवात झाली. आमच्या ग्रुपचा मैत्री दिन कांजूरमार्गमधील वात्सल्य ट्रस्टसोबत साजरा झाला. तिथल्या लहान मुलांशी खेळलो, गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा लहान झालो. आम्ही सगळ्यांनी आपापल्या पॉकेटमनीमधून मदत करत त्या मुलांना जीवनावश्यक वस्तू दिल्या. या सगळ्यातून मला दरवेळी एक नवीन ऊर्जा मिळते. एवढंच नव्हे तर नवरात्रीत आमचा क्षणभर विश्रांतीचा 'अनोखा गरबा' ही चांगलाच रंगला. हा गरबा साधासुधा नसून आम्ही अस्तित्व या गतीमंद मुलांच्या संस्थासोबत साजरा केला. हे आणि असे अनेक अविस्मरणीय क्षण मला क्षणभर विश्रांती ग्रुपनं दिले आहेत. अलीकडेच दिवाळीच्या मुहूर्तावर आम्ही पालीच्या माणगाव तालुक्यातील रवाळजे गावात आदिवासी वाडीला भेट दिली. तिथल्या शाळा आणि आश्रमात घालवलेला वेळ खूप सुंदर होता. तिथल्या ९० कुटुंबांना मदतीचा हातभार लावला. नवीन वर्षात आम्ही सगळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावं यासाठी जादूचे प्रयोग आणि शिक्षणाचं महत्त्व सांगणारे काही उपक्रम आखत आहोत. समाजाप्रती असलेलं ऋण फेडताना लोकांकडून मिळणारी ऊर्जा मला वेगळाच आनंद देऊन जाते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज