अ‍ॅपशहर

साथ जिवलगांची

सन २०१३ मध्ये शहापूर येथे राहण्यास आलो. अनेक जिवलग मित्र मंडळी शहापूरमध्ये आधीच स्थायिक झाली होती. या सर्वांना एकत्र कसं आणता येईल? या विचारमंथनातून भिशी काढण्याचा विचार सुचला. सर्वांना फोन करुन बोलावलं.

Maharashtra Times 31 Jan 2017, 12:24 am
विजयकुमार देसले, शहापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reunion of friends
साथ जिवलगांची


सन २०१३ मध्ये शहापूर येथे राहण्यास आलो. अनेक जिवलग मित्र मंडळी शहापूरमध्ये आधीच स्थायिक झाली होती. या सर्वांना एकत्र कसं आणता येईल? या विचारमंथनातून भिशी काढण्याचा विचार सुचला. सर्वांना फोन करुन बोलावलं. भिशीची कल्पना सर्वांसमोर ठेवली. या कामी जिवलग मित्र नामदेव बांगर याने खूप मदत केली. भिशीची नियमावली तयार केली. एका फोनसरशी २० शिक्षकमित्र जमा झाले. प्रत्येकी महिन्याला १५०० रुपये भिशी काढायची ठरली. पैसे केवळ निमित्तमात्र एकत्र येणं हा मुख्य उद्देश होता. त्यातून सर्वानुमते एक हजार पिकनिक फंड म्हणून बाजूला ठेवण्याचं ठरवलं. या भिशीचं 'प्रेरणा प्रतिष्ठान' नामकरण कधी झालं हे समजलं देखील नाही. सर्व मित्र-परिवाराच्या आग्रहाखातर या प्रतिष्ठानचे अध्यक्षपद मी स्वीकारलं.
जानेवारी २०१७मध्ये नीलकंठ विशे, जयवंत पडवळ, नामदेव बांगर, सदाशिव सातपुते, योगेश रोठे, तुकाराम देसले, मनोज गोंधळी, शंकर सातपुते, राजेश रोठे, यशवंत केदार, अब्दुल शेख, फारुख शेख, अनंता घोडविंदे, गणेश रिकामे, राजकुमार शेलवले, योगेश ठाकरे, गजानन भालके, धनाजी दळवी, पांडुरंग भोईर या सर्व जिवलगांबरोबर बाहेर फिरायला जायचंच हा विचार मनात पक्का केला. सर्व मित्र लगेच तयारही झाले. सर्व सदस्यांशी विचार विनिमय करुन पाली, रायगड दर्शन, अलिबाग, काशिद बीच अशी सहल निश्चित केली.
दोन दिवसांचा मिनी बसचा प्रवास, प्रवासातील मित्रांसोबत घालवलेले क्षण कधीही न विसरता येण्यासारखे आहेत. स्वयंपाकाची सर्व व्यवस्थासोबत असल्याने पद्माकर हरणे (मामा) यांनी केलेल्या सुग्रास मेजवानीचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. प्रवासात केलेली धमाल, रायगड आणि समुद्र किनाऱ्यावरील विविध क्षण, गाणी-गोष्टी अन् बरचं काही यातून खऱ्या अर्थाने मैत्री बहरली. आमचा हा जिवलगांचा कट्टा एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच असतो आणि यापुढेही राहील. पुढील काळात काही शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आमचा हा कट्टा कटीबद्ध असेल यात काही शंकाच नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज