अ‍ॅपशहर

एक दिवस मैत्रीचा

निसर्गाच्या कुशीत, डोंगररांगांमध्ये वसलेल्या टुमदार अशा कर्जत गावातील जुन्नरकर वाड्यातील आम्ही मैत्रिणी एकमेकींपेक्षा लहान-मोठ्या आहोत. सर्व बालपण वाडा संस्कृतीत गेल्यामुळे खूप काही शिकता आलं. एकोपा, खिलाडू वृत्ती, एकमेकांना मदत, समजून घेणं ही शिकवण वाड्याने दिली. आमची शाळा एक व कॉलेज वेगवेगळी होती.

Maharashtra Times 21 Jun 2017, 12:06 am
समता गोडबोले, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reunion of friends
एक दिवस मैत्रीचा


निसर्गाच्या कुशीत, डोंगररांगांमध्ये वसलेल्या टुमदार अशा कर्जत गावातील जुन्नरकर वाड्यातील आम्ही मैत्रिणी एकमेकींपेक्षा लहान-मोठ्या आहोत. सर्व बालपण वाडा संस्कृतीत गेल्यामुळे खूप काही शिकता आलं. एकोपा, खिलाडू वृत्ती, एकमेकांना मदत, समजून घेणं ही शिकवण वाड्याने दिली. आमची शाळा एक व कॉलेज वेगवेगळी होती. रात्री एकत्र अभ्यास करणं, एकमेकांचं पाठांतर घेणं, शिकवणं यामुळे अभ्यास पक्का झाला. सुट्टीत लगोरी, लंगडी, लपाछपी, पत्ते, बॅडमिंटन, क्रिकेट हे खेळ खेळणं तसंच एकत्र फिरायला जाणं, एकमेकींना स्वयंपाक शिकवणं करत असू. शोभा ताईकडून रामरक्षा, संस्कृत श्लोक शिकलो. आम्ही सासरी गेल्यानंतर सगळ्या आवडत्या झालो, भेट दुर्मिळ होत गेली. फक्त फोनवर बोलणं व्हायचं नंतर ठरवून वर्षातून एकदा प्रत्येकीच्या घरी भेटलो. हा दिवस सर्वांच्या सोयीने ठरवला जातो. एकमेकींच्या मदतीने घरीच जेवण बनवून जेवतो, भरपूर गप्पा मारतो आणि लहानपणीच्या आठवणीत रमतो. त्यामुळे आम्हाला वेगळा असा मैत्री दिन साजरा करावा लागत नाही. ज्यादिवशी भेटतो तो आमचा मैत्री दिन असतो. अशीच आमची मैत्री चिरंतन राहो हीच देवाजवळ प्रार्थना! आजही या मितीला चांगल्या-वाईट प्रसंगी आम्ही एकमेकींकडे मदतीला धावत जातो. आम्हाला फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलायला आवडतं, त्यामुळे तो दिवस वर्षभराचा उत्साह देऊन जातो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज